Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकालच्या 'त्या' अफवेनेच लासलगाव मार्केटला वाढली गर्दी...

कालच्या ‘त्या’ अफवेनेच लासलगाव मार्केटला वाढली गर्दी…

लासलगाव | प्रतिनिधी

नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात काल काही जुने फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. यामुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्यांनी आज लासलगाव मार्केटला मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणल्यामुळे ६५० रुपयांची सरासरी घसरण लाल आणि उन्हाळ कांद्यात झाली. जेव्हा ही निव्वळ अफवा असल्याची माहिती शेतकऱ्यांच्या कानावर पडली तेव्हा त्यांचीही काहीशी निराशा झालेली बघायला मिळाली.

- Advertisement -

आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजारसमितीकडे बघितले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा येथील कांद्याच्या भावाकडे लागून राहतात. आज झालेली ६५० रुपयांची घसरण शेतकऱ्यांसाठी निराशाजनक राहिली.

शनिवारी उन्हाळ कांद्याचे किमान दर १७०० रुपये होते तर कमाल ४७०० रुपये होते. सरासरी ४१५० रुपये प्रतीक्विंटल दराने कांद्याची विक्री झाली.

हाच दर सोमवारी किमान १७०० तर कमाल ४४०० रुपये राहिला यामध्ये ३०० रुपयांची घसरण बघायला मिळाली. तर सरासरी उन्हाळ कांदा आज ३४०० रुपये दराने विक्री झाला. यामध्ये शनिवारच्या तुलनेत आज ६५० रुपयांची घसरण झाली.

या तुलनेत लाल कांद्याला शनिवारी ओपनिंग जोरात झाली होती. लाल कांदा किमान २६०० ते कमाल ५००१ दराने विक्री झाला होता. तर सरासरी या कांद्याचा दर ४१०० रुपये इतका राहिला होता. हाच कांदा आज सोमवारी किमान २१०० रुपये तर कमाल ५०८० रुपये दराने विक्री झाला. सरासरी कांदा ३४५० रुपयांनी विक्री झालेला बघायला मिळाला. त्यामुळे लाल कांद्यातही आज ६५० रुपयांची घसरण झाली.

उन्हाळ कांद्याची आवक अंदाजे ९६०० क्विंटल (८५० नग) इतकी होती तर लाल कांदयाची आवक अंदाजे १५० क्विंटल (५० नग) इतकी होती.

बाजारभाव रूपये प्रति क्विंटल

(किमान-कमाल-सर्वसाधारण)

उन्हाळ कांदा – १००० – ४४०० – ३३००

लाल कांदा – २१०० – ५०८० – ३४५०

मका – १३६० – १५४५ – १४५१

सोयाबीन – ३००० – ४३२६ – ४१६०

गहू – १४७० – १९०० – १५८०

बाजरी – १००० – १६३५ – १२५१

हरभरा – ४००० – ५४०१ – ४८०१

मुग – २००० – ४७५१ – ४५००

- Advertisment -

ताज्या बातम्या