Video : निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन; त्र्यंबक नगरी दुमदुमली

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त (Nivrutinath Maharaj Yatra) 'सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी, धन्य धन्य निवृत्ती देवा... समाधी त्र्यंबक शिखरी.... मागे शोभे ब्रह्मगिरी...असा महिमा वर्णावा किती' असे म्हणत टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या (Varakari) भक्तीभावाने त्र्यंबकनगरी दुमदुमल्याचे पहायला मिळत आहे.

आज (दि.१८) रोजी पहाटेच्या सुमारास जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सपत्नीक संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधीची शासकीय महापूजा केली. यावेळी दर्शनाचा पहिला मानकरी होण्याचा मान औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurngabad District) वैजापूर तालुक्यातील सूर्यवंशी दाम्पत्याला मिळाला.

Video : निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन; त्र्यंबक नगरी दुमदुमली
'या' राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

करोनामुळे सतत दोन वर्ष यात्रेत खंड पडला होता. पंरतु, यंदा परिस्थिती आटोक्यात आल्याने त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे मोठ्या उत्साहात संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव साजरा होत आहे. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्यांनी परिसर फुलला असून गळ्यात तुळशी माळा, डोक्यावर तुळशीवृंदावन, हाती टाळ, मृदुंग, भगव्या पताका घेतलेल्या लाखो वारकऱ्यांनी त्र्यंबकनगरी गजबजली आहे.

त्याचबरोबर श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला (Brahmagiri Pradakshina) असलेले महत्व यात्रेच्या वेळीही दिसून आले. यात्रोत्सवासाठी आलेल्या वारकऱ्यांनी काल रात्रीपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस सुरुवात केली होती. त्यानंतर पहाटेच्या सुमारास कुशावर्तावर येऊन डुबकी मारत पवित्र होण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. तर संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Video : निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन; त्र्यंबक नगरी दुमदुमली
हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; १६ जणांचा मृत्यू

दरम्यान, करोनाच्या (Corona) दोन वर्षाच्या व्यत्ययानंतर संत निवृतीनाथांच्या यात्रेसाठी पायी दिंड्या निघाल्याने वारकऱ्यांसह भाविक समाधान व्यक्त करत आहेत. तसेच त्र्यंबकच्या ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या उत्साहाने निवृतीनाथांचे दर्शन घेतांना दिसत असून यात्रोत्सवाचा आनंद लुटत आहेत.

Video : निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन; त्र्यंबक नगरी दुमदुमली
Nashik : चोरट्यांचा धुडगूस; चार ते पाच दुकाने फोडली, लाखोंचा ऐवज लंपास

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com