बारावीच्या गुणपत्रिका आजपासून मिळणार

बारावीच्या गुणपत्रिका आजपासून मिळणार

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (maharashtra board) बारावीचा निकाल (hsc result) ऑनलाईन जाहीर झाला होता. आता विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणपत्रिका (Marksheet) शनिवार (दि.२१) ऑगस्टपासून त्यांच्या महाविद्यालयात देण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठरावीक दिवशीच गुणपत्रिका (Marksheet) नेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये, अशी सूचना राज्य मंडळाने कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे.

बारावीच्या गुणपत्रिका आजपासून मिळणार
अफगाणिस्तानची सत्ता हस्तगस्त करणारे तालिबान आहे तरी काय?

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या लक्षात घेऊन जास्त वितरण केंद्रे निर्माण करणे किंवा त्याच वितरण केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवून वितरण खिडक्यांची संख्या वाढवून गुणपत्रिका वितरित कराव्यात, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत.

निकालाचे हे आहे सूत्र

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालंत परीक्षेचा निकाल ३० :३०: ४० या पद्धतीने लावण्यात येणार आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता दहावी मधील बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण यावर आधारित ३० टक्के गुण ग्राह्य धरले जातील. तर दुसरीकडे अकरावी परीक्षेच्या वार्षिक मूल्यमापन आतील विषयनिहाय गुण याचा ३०टक्के विचार केला जाईल इयत्ता बारावी वर्षभरात अंतर्गत मूल्यमापन आतील प्रथम सत्र परिक्षा सराव परीक्षा सराव चाचण्या तसेच मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण ४० टक्के ग्राह्य धरले जाणार आहेत.

दहावी मार्क्स यावर ३० टक्के

११ इयत्ता मार्क्स यावर सरासरी ३० टक्के

१२ इयत्ता यासाठी अंतर्गत परिक्षा यावर ४० टक्के गुण असतील

इयत्ता १२वी च्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण लक्षात घेतले जातील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com