Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याHSC/SCC Examination: ठरवून दिलेल्या वेळेत न पोहोचल्यास परीक्षाकेंद्रात 'नो एन्ट्री'

HSC/SCC Examination: ठरवून दिलेल्या वेळेत न पोहोचल्यास परीक्षाकेंद्रात ‘नो एन्ट्री’

नाशिक | Nashik

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (Higher Secondary School Certificate) (इ.12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (Secondary School Certificate) (इ. 10 वी) परीक्षेसाठी परीक्षा दालनात विलंबाने येणार्‍या परीक्षार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. मात्र, या सवलतीचा गैरफायदा घेवून लेखी परीक्षेस उशिरा प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांंच्या मोबाईलमध्ये गैरमार्गाने प्रसारीत झालेला प्रश्नपत्रिकेतील आशय निदर्शनास आल्याने या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी लेखी परीक्षेस उशिराने प्रविष्ठ होवू देण्याची सवलत आजपासून (दि. 16) पासून बंद करण्यात आली आहे…..(hsc and ssc examination students no entry after examination time)

- Advertisement -

12 वी ची लेखी परीक्षा दि. 4 मार्च ते 7 एप्रिल व 10 वी ची लेखी परीक्षा दि. 15 मार्च ते दि. 4 एप्रिल या कालावधीत होत आहे. लेखी परीक्षेसाठी विहीत वेळेपेक्षा (सकाळ संत्रात 10.30 वा. व दुपार सत्रात 3.00 वा.) उशिराने येणा-या विद्यार्थ्यांबाबत उत्तरपत्रिका लेखन प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीत सदर वेळेनंतर 10 मिनिटे उशिरा येणार्‍या परीक्षार्थ्यांना विलंबाच्या कारणाची खातरजमा करून केंद्रसंचालक स्तरावर परवानगी देण्यात येत होती. (Central examination in charge level)

10 मिनिटांनंतर अतिशय अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होण्यास केंद्रावर आल्यास व त्यामागचे कारण केंद्रसंचालकांना रास्त वाटल्यास त्यांनी विभागीय अध्यक्ष / विभागीय सचिव यांची दूरध्वनीवरून पूर्वमान्यता घेवून आणखी 10 मिनिटे (एकूण 20 मिनिटांचा) बिलंब क्षमापित करून परीक्षार्थ्याला परीक्षेस बसु दिले जात होते.

मात्र, या सवलतीचा लाभ घेवून लेखी परीक्षेस उशिरा प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांंच्या मोबाईलमध्ये गैरमार्गानि प्रसारीत झालेला प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ती सवलत बंद करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर (प्रश्नपत्रिका वाटप करण्याच्या वेळेपर्यंत) म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये स. 10.20 पर्यंत आणि दुपारच्या सत्रामध्ये दु. 2.50 पर्यंत परीक्षा कक्षामध्ये हजर राहणे बंधनकारक राहील.

विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होतेवेळी म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये स. 10.30, व दुपारच्या सत्रामध्ये दु. 3. वा. पर्यंत आल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी त्यांची तपासणी करून विद्यार्थ्यास विभागीय मंडळाच्या मान्यतेने परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात यावी.

परीक्षा सुरू झाल्यानंतर म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये स. 10.30 नंतर व दुपार सत्रामध्ये दु. 3. नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात येवू नये.

सर्व विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) व जिल्हाधिकारी (Collector) यांना जास्तीत जास्त दक्षता पथके कार्यान्वीत करून परीक्षा केंद्र / उपकेंद्रांना वारंवार भेटी देवून परीक्षा काळात होणार्‍या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी शासन स्तरावरून निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रात मोबाईल व अन्य तत्सम साधने बाळगण्यास व वापरण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या