महसूल वसुलीत विभागामध्ये नाशिक कुठे?; जाणून घ्या

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashik Collector Office

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात महसूल विभागाच्या (Revenue Department) अधिकाऱ्यांनी १०० टक्के महसूल वसुलीचे ठेवले आहे. त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलत डिसेंबर २०२१ अखेर एकूण ५४ टक्के वसुली पूर्ण झाली आहे. त्यामुळे नाशिक विभागात नाशिक जिल्हा अव्वल स्थानी पोहोचला आहे....

जिल्ह्यावर करोनाच्या (Corona) विषाणूच्या नव्या व्हेरीएंटमुळे होत असलेली रुग्णवाढ बघता तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) टांगती तलवार डोक्यावर असतानादेखील महसूल विभागाने आता वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे.

नाशिक विभागातील पाचही जिल्हे मिळून ३१ डिसेंबरपर्यंत एकूण उद्दिष्टांच्या ४० टक्के वसुली पूर्ण केली आहे. त्यामध्ये विभागात वसुलीमध्ये नाशिक (Nashik) अव्वल असून, ५४ टक्के वसुली पूर्ण झाली आहे.

राज्य सरकारने चालू वर्षी नाशिक विभागाला ७९२ कोटी ८२ लाख ३८ हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामध्ये जमीन महसूलसाठीचे ३०३ कोटी ८७ लाख ३८ हजार तसेच गौणखनिजाच्या ४८८ कोटी ९५ लाख रुपयांचा समावेश आहे. विभागातील पाचही जिल्हे मिळून ३१ डिसेंबरपर्यंत ३१६ कोटी १९ लाख ५७ हजार रुपयांची वसुली पूर्ण केली.

नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik District) शासनाने (Government) २५९ कोटी ८८ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. करोनाचे (Corona) संकट असताना देखील प्रशासनाने वर्षअखेरीस १३९ कोटी २८ लाख ६७ हजार रुपयांची वसुली पूर्ण केली असून, ते प्रमाण ५४ टक्के आहे.

त्यामध्ये जमीन महसूलच्या (Land revenue) ११४ कोटी ६० लाख रुपयांपैकी ४४ कोटी १४ लाख ८७ हजार (३९ टक्के) इतके आहे. तसेच गौणखनिजच्या १४५ कोटी २८ लाखांपैकी ९५ कोटी १३ लाख ८१ हजार रुपये (६५ टक्के) वसुली (Recovery) प्रशासनाने पूर्ण केली आहे.

विभागातील अन्य जिल्ह्यांपैकी धुळ्यात (Dhule) अवघी २९.२९ टक्के वसुली झाली आहे. तर नंदुरबारला ३४.४४ टक्के, जळगावला ३८.२० तर नगर जिल्ह्याने ३०.१८ टक्के वसुली (Recovery) आतापर्यंत पूर्ण केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com