Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकसबा पोटनिवडणुकीत चर्चेत असलेल्या बिचुकले आणि दवे यांना किती मतं पडली?

कसबा पोटनिवडणुकीत चर्चेत असलेल्या बिचुकले आणि दवे यांना किती मतं पडली?

पुणे | Pune

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कसबा मतदारसंघात (Kasba Constituency) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला आहे. केंद्रासह राज्यात बलवान असलेला भाजप या मतदारसंघात मात्र कमकुवत ठरला आहे.

- Advertisement -

आज लागलेल्या निकालात तब्बल 28 वर्षांनी कसब्यात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. तर, रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. कसब्यात रवींद्र धंगेकरांचा विजय झाला असला तरी सोशल मीडियावर (Social media) चर्चा रंगत आहे बिग बॉस (Big Boss) फेम, तसेच कसबा पेठ मतदारसंघातील पराभूत उमेदवार अभिजीत बिचुकले यांना मिळालेल्या मतांची.

कसबा पेठ हा मतदारसंघ भाजपचा (BJP) बालेकिल्ला समजला जात होता, भाजपने हा मतदारसंघ हाती ठेवण्यासाठी प्रचारादरम्यान सर्व प्रयत्न केले होते. शेवटच्या प्रचारसभांना तर आजारपणाने त्रस्त असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांना देखील मैदानात उतरवले होते. त्यामुळे आपला उमेदवार निवडून येईल, अशी शाश्वती भाजपला होती. कसबा पेठ मतदारसंघात भाजप उमेदवाराचा विजय व्हावा, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कसब्यात तळ ठोकावा लागला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर रात्री-अपरात्री मतदारांना भेटत होते. तरीही पोटनिवडणुकीत (By-elections) कसबा पेठ मतदारसंघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. कसबा पेठ मतदारसंघात विजय महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा झाला असला, तरी सोशल मीडियावर पराभूत उमेदवार अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle) यांना मिळालेल्या ४७ मतांची चर्चा होत आहे.

सहाय्यक निबंधकास पंधरा हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

एवढ्या काट्याच्या लढतीत बिचुकले यांना मिळालेली ती ४७ मते नेमकी कोणत्या हितचिंतकांनी दिली असावी याची चर्चा जोरदार सुरु आहे. त्याचबरोबर बाह्मण महासंघाचे आनंद दवे (Anand Dave) यांनाही २९६ मते मिळाली आहेत त्यांचीही चर्चा या मतदारसंघात सुरु आहे.

दरम्यान, या कसबा पेठ मतदारसंघातील पराभवावर अभिजीत बिचुकले यांनी (Abhijit Bichukale)  आपली प्रतिक्रिया दिली आहे. बिचुकले म्हणाले, ‘आज पराभव झाला असला तरी जनतेच्या मनात एक ना एक दिवस अढळ स्थान निर्माण करीन.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Assembly Election 2023 Results : त्रिपुरा, मेघालय, नागालँडमध्ये कुणाचे वर्चस्व?; जाणून घ्या सविस्तर

साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा सव्वा लाखांनी पराभव झाला होता. म्हणून त्यांनी समाजकारण सोडले नाही. मी तर स्वत:च्या मनगटाच्या बळावर समाजकारण करीत आहे’. त्यामुळे येणाऱ्या काळात जनतेच्या मनात स्थान निर्माण करून नक्कीच विजय मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या