आर्थिक व्यवहार आत्ताच उरकून घ्या! ऑगस्टमध्ये 'इतक्या' दिवस बँका बंद

१ ऑगस्टपासून देशात 'हे' नियम बदलणार
आर्थिक व्यवहार आत्ताच उरकून घ्या! ऑगस्टमध्ये 'इतक्या' दिवस बँका बंद

मुंबई | Mumbai

दि. १ ऑगस्टपासून एलपीजी सिलिंडरच्या (LPG Price) किमती दर महिन्याच्या पहिल्याच दिवशी निश्चित केल्या जाणार आहेत. तसेच रोख व्यवहारांसंबंधित नियमही बदलणार आहेत. ऑगस्टमध्ये अनेक सण साजरे होणार असल्याने तब्बल १३ दिवस बंद राहणार आहेत...

याशिवाय बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) चेकशी संबंधित नियम १ ऑगस्टपासून बदलणार आहे. बँक ऑफ बडोदामध्ये पॉजिटिव पे सिस्टम (Positive Pay System) जारी करण्यात येणार आहे.

गॅसच्या किमती १ तारखेला होणार निश्चित

एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमती दर महिन्याच्या १ तारखेला निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्या गॅस सिलिंडरचे दर १ तारखेला ठरवतील.

आर्थिक व्यवहार आत्ताच उरकून घ्या! ऑगस्टमध्ये 'इतक्या' दिवस बँका बंद
सत्तांतरानंतर शरद पवार पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर

बँका १३ दिवस राहणार बंद

ऑगस्टमध्ये एकूण १३ दिवस बँका बंद (Bank Holidays) राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ऑगस्टमध्ये आपल्या यादीत अनेक दिवस बँक बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. ऑगस्टमध्ये मोहरम, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी असे अनेक सण आहेत, ज्या दिवशी बँकांना सुट्टी असेल. याशिवाय रविवारी दुसरा आणि चौथा शनिवार साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका बंद राहणार आहेत. या साप्ताहिक सुट्या धरून ऑगस्टमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार आहेत.

बँक ऑफ बडोदाचे चेक पेमेंट नियम बदलणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, बँक ऑफ बडोदानं चेक पेमेंटचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्टपासून ५ लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेक पेमेंटसाठी पॉजिटिव पे सिस्टम (Positive Pay System) जारी करण्यात आली आहे.

याअंतर्गत चेक जारी करणाऱ्या व्यक्तीला चेकसंबंधित माहिती एसएमएस (SMS), नेट बँकिंग (Net Banking) किंवा मोबाइल अ‍ॅपद्वारे (Mobile App) बँकेला देणे अनिवार्य असणार आहे. त्यानंतरच चेक क्लिअर करण्यात येईल. बँकेने एकाधिक धनादेश (Check) जारी केल्यास, त्याचा क्रमांक, देयकाची रक्कम आणि प्राप्तकर्त्याचे नाव यांच्यासह अनेक तपशील बँकेला प्रदान करावे लागतील.

पॉजिटिव पे सिस्टम म्हणजे काय?

रिझर्व्ह बँकेने 2020 मध्ये धनादेशांसाठी पॉजिटिव पे सिस्टम सुरू केली. या प्रणालीद्वारे चेकद्वारे पेमेंट करण्यासाठी 50 हजारांपेक्षा जास्त पेमेंटसाठी काही महत्त्वाची माहिती आवश्यक आहे. या प्रणालीनुसार एसएमएस (SMS), बँकेच्या मोबाईल अ‍ॅप (Mobile App) किंवा एटीएमद्वारे (ATM) चेक जारी करणाऱ्या व्यक्तीला चेकशी संबंधित काही माहिती बँकांना द्यावी लागते. सर्व तपशील बरोबर असल्यावरच धनादेश दिला जातो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com