प्रतिबंधित गुटखा शहरात येतोच कसा?

शासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज
गुटखा
गुटखा

नाशिक | फारूक पठाण | Nashik

शासनाने पान मसाल्यासह (Pan Masala) गुटखा (gutkha) याच्यावर प्रतिबंध घातले आहे. तरीही नाशिक (nashik) शहरातील विविध भागांमध्ये गुटख्याची विक्री होत असते.

अनेक वेळा पोलीस विभागाच्या (Police Department) वतीने छापेमारी (raid) करून लाखो रुपयांचा गुटखा देखील जप्त करण्यात आला आहे, तर विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र हा गुटखा (gutkha) नाशिक शहरात येतोच कसा याचा तपास लावणे महत्त्वाचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

मागील दोन महिन्यांपासून नाशिक शहरात पोलिसांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अवैध प्रमाणे प्रतिबंधित गुटखा, पान मसाल विकणाऱ्यांवर कारवाई होत आहे तसेच गुटख्याची साठवणूक करणाऱ्या लोकांवर देखील कारवाई होत आहे. या दरम्यान पोलीस विभागाच्या वतीने लाखो रुपयांचा गुटखा (gutkha), पान मसाला जप्त करण्यात आला आहे तर अनेक दोषींवर कारवाई देखील झाली आहे. मात्र याप्रमाणे कारवाई करून उपयोग होणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

कारण प्रतिबंधित गुटखा शहरात येतोच कसा याबाबत तपास करणे महत्त्वाचे आहे. शहरात गुटखा आलाच नाही तर त्याची विक्री होणार नाही असेही बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच नवीन नाशिक (navin nashik) भागातून तब्बल १८ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. प्रतिबंधित सुगंधित पानमसाला व तंबाखू (tobacco) अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देश असलेल्या दोन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित अतुल सुभाष कोठावदे (रा. घनश्याम पार्क, नवीन नाशिक) व ज्ञानदीप चिंचोले (रा. पंचवटी) हे दोघे (एमएच १५ जीयू २७४७) अॅक्टिव्हा मोटारसायकलवर प्लास्टिकच्या तीन गोण्यांमध्ये प्रतिबंधित असलेला १२ हजार ९६० रुपये किमतीचा हिरा पानमसाला, ३ हजार २४० रुपये किमतीचा रॉयल तंबाखू, ७२० रुपये किमतीचा वाह पानमसाला, ९६० रुपये किमतीचा राज निवास सुगंधित पानमसाला, ३९६ रुपये किमतीचा विमल पानमसाला,

७५ रुपये किमतीची डब्ल्यू चिंग तंबाखू, २८८ रुपये किमतीचा एक्सएल जाफरानी पानमसाला, असा एकूण १८ हजार ६२९ रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला व तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात होते, त्यांच्यावर नवीन नाशिक भागातील महाराणाप्रताप चौकात कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे सतत कारवाई सुरू असली तरी पोलीस प्रशासनासह शासनाच्या इतर विभागांनी समन्वय करून विशेष पथक तयार करण्याची गरज आहे, जेणेकरून प्रतिबंधित माल शहरात येणारच नाही.

शाळा जवळ देखील विक्री

शासनाच्या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थाच्या जवळ कोणत्याही प्रकारे पान मसाला किंवा सिगारेट विक्रीची दुकाने नसावीत. मात्र शहरातील अनेक भागात शैक्षणिक संस्था जवळ पान टपऱ्या दिसतात. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com