निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या इगतपुरीतील रेव्ह पाटर्य़ां कशा रोखणार ?

jalgaon-digital
3 Min Read

मुंबईपासून जवळ असलेला व निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या इगतपुरी (igatpuri) तालुक्यातील गेल्या काही वर्षांपासून वाढणाऱ्या रेव्ह पार्ट्या (rave party) स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरु लागल्या आहेत. ललनांच्या सहभागाने होणारी नृत्य, अंमली पदार्थांचे (drugs)सेवन यामुळे निसर्गसौंदर्याएेवजी वेगळीच ओळख तालुक्याची होत आहे. मुंबई, पुण्यातील बडय़ा असामींची मुले या ठिकाणी अशा पार्टीमध्ये सहभागी होत असल्याचे उघड झाले होते. परिसरातील डोंगर-दऱ्यांमध्ये काही रिसॉर्ट, मुंबईतील धनिकांचे बंगले आहेत. आता रविवारी झालेल्या घटनेत २२ जणांवर कारवाई झाली आहे. त्यात दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहेत.

इगतपुरीत रेव्ह पार्टी करणाऱ्या २२ जणांना अटक

यापुर्वी मार्च २०१८ मध्ये तळेगाव शिवारातील मिस्टिक व्हॅली रिसोर्ट परिसरात सुरू असलेल्या नृत्य पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी १० जणांना अटक केली होती. या पार्टीसाठी मुंबईहून आलेल्या सहा मुलींनाही ताब्यात घेण्यात आले. तळेगाव शिवारात मिस्टिक व्हॅली नामक रिसॉर्ट आहे. त्यावर मार्चमध्ये ही कारवाई झाली आहे.

अॉक्टोंबर २०१७ मध्ये इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी शिवारात रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये होत असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी ९जणांना अटक करण्यात आली होती.

चार वर्षांपुर्वी मार्च २०१७ मध्ये इगतपुरी- तळेगाव शिवारात मुंबई- आग्रा महामार्गावरील एका प्रतिष्ठित रिसॉर्टच्या परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या बॅचलर पार्टीवर इगतपुरी (igatpuri)पोलिसांनी धाड टाकून ६ बारबालांसह इतर ७ जणांना अटक केली होती. संशयितांपैकी किमान तीन मुलांचे नातेवाईक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी होते. भारतात मुंबई, बंगळुरू आदी महानगरांमध्ये होणाऱ्या स्ट्रीपटीज पार्टी त्यावेळी झाली होती. त्यासाठीच मुंबईहून या पार्टीत खास बारबालांना आणले गेले होते.

गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे जवळपास राज्य ब्रेक द चेन (Break the chain)मध्ये आहे. या काळात एकत्र फिरण्यास बंदी आहे. लग्न समारंभ व अंत्यसंस्कारासाठी मर्यादा आल्या आहे, असे असताना इगतपुरीत (igatpuri) रेव्ह पार्टी (rave party) झाली. गावात असे प्रकार अधुनमधून होत असतात. परंतु ते उघड होत नाही. यामुळे इगतपुरीत रेव्ह पार्टीला कायमस्वरुपी आळा बसावा यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.

रविवारी रेव्ह पार्टीत 22 जणांचा समावेश

स्काय ताज विलामध्ये (Sky Taj Villa) रेव्ह पार्टी (rave party) सुरु असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Superintendent of Police Sachin Patil) यांना समजली. त्यानुसार त्यांनी धाड टाकली असता त्याठिकाणी मनोरंजन विश्वातील चार महिला सापडल्या. यामध्ये बिग बॉस (big boss fame) या रिअ‍ॅलिटी शोमध्ये (Reality show) भाग घेतलेल्या एका महिलेचाही (Bigg Boss Fame Actress) समावेश आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण 22 जणांना ताब्यात घेतले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *