Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात हाॅॅटेल, लाॅज या तारखेपासून सुरु हाेणार

राज्यात हाॅॅटेल, लाॅज या तारखेपासून सुरु हाेणार

मुंबई/ Mumbai

गेल्या १०० दिवसांपेक्षा जास्त काळ बंद असलेली हॉटेल्स आता राज्यात सुरु हाेणार आहे. ठाकरे सरकारने साेमवारी हा निर्णय घेत अनलाॅकच्या दिशेने अजून एक पाऊल टाकले आहे. मात्र रेस्टॉर्ंट्सना अजूनही परवानगी दिली गेली नाही. येत्या ८ जुलैपासून हाॅटेल्स व लाॅज उघडणार आहेत. मात्र, राहण्याची क्षमता असलेल्या हॉटेल्समध्ये ३३ टक्के ग्राहकांना राहण्याची संमती राज्य सरकारने दिली आहे. राज्यात आता हळूहळू अनलॉक होत असताना काही उद्योगांना परवानगी देण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील उद्योगधंदे पूर्णपणे बंद करण्यात आले होते, मात्र मिशन बिगीन अगेनमध्ये काही अंशी उद्योग सुरू करण्यास मान्यता मिळाली. मात्र हॉटेल व्यवसायाला परवानगी देण्यात आली नव्हती. आता राज्यभरातील हॉटेल्स आणि लॉजिंग सुरू करण्यात येणार असल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे आहेत नियम

हॉटेलच्या क्षमतेनुसार फक्त ३३ टक्के ग्राहकांना संमती मिळेल.

ग्राहकांचे थर्मल स्क्रिनिंग करणे सक्ती असणार.

सॅनिटायझरचा वापर सक्तीचा असणार आहे.

हॉटेल्समधील गेमिंग झोन, स्विमिंग पूल आणि जिम बंद राहणार.

हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी मास्कचा वापर बंधनकारक.

राज्य शासनाच्या आदेशान्वये नाशिक शहर व जिल्ह्यातही हाॅटेल व लाॅज सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिलेले नियम व अटीशर्तींची अंमलबजावणी झाली पाहिजे. हाॅटेल व लाॅजच्या एकूण क्षमतेच्या ३३ टक्के ग्राहकांना राहण्याची परवानगी आहे.

– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या