Sunday, April 28, 2024
HomeनाशिकVideo : धक्कादायक! नाशिकमधील खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपले : रुग्णांचा जीव धोक्यात

Video : धक्कादायक! नाशिकमधील खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपले : रुग्णांचा जीव धोक्यात

नाशिक

नाशिक शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसंदिवस वाढत असतांना ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने अधिग्रहित केलेल्या सुविचार हॉस्पिटलमधील ऑक्सिजनचासाठा संपला आणि अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या रुग्णालयातील ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.

- Advertisement -

रुग्णांच्या नातेवाईकांना फोन

द्वारका परिसरातील सुविचार या खासगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन आज संपला आहे. या रुग्णालयात ३० रुग्ण ऑक्सिजनवर असून त्यातील ६ जण अत्यवस्थ आहेत. ऑक्सिजन नसल्याने या रुग्णांना अन्य हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात यावे, असे हॉस्पिटल प्रशासनाने आम्हाला फोन करुन सांगितल्याचे रुग्णाच्या नातेवाईक अर्चना व्यवहार यांनी सांगितले. आता आम्ही कुठे जावे? इतर रुग्णालयातूनही ऑक्सिजनचा साठा आमच्या रुग्णांपुरता असल्याचे उत्तर मिळत असल्याचे व्यवहारे यांनी सांगितले.

हॉस्पिटल प्रशासन हतबल

दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने यासंदर्भात हतबलता व्यक्त केली. मागणी करुनही ऑक्सिजन मिळत नसल्याने हॉस्पिटलचे डॉ श्याम पाटील यांनी सांगितले. दरम्यान, येथील ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना अन्य हॉस्पिटलमध्ये हलविण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मात्र, अन्य खासगी हॉस्पिटलमध्येही ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्याने या रुग्णांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

हताश नातेवाईकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना रुग्णांना तातडीने ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली. रुग्ण गंभीर आहेत, इतर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नाही? मग आम्ही जावे कुठे असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या