Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या...तर २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग

…तर २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील एक विधान केलं आहे. २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. ते कल्याणमध्ये एका व्याख्यानमालामध्ये बोलत होते.

व्याख्यानमालेमध्ये बोलताना कपिल पाटील यांनी जनतेला कांदे, बटाटे, तूरडाळ या सगळ्यातून बाहेर पडण्यास सांगितले २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्याची शक्यता आहे. हे सर्व मोदी करू शकतात, असे ही ते म्हणाले. सोबत त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले.

- Advertisement -

कपिल पाटील म्हणाले, काश्मीरमधील ३७० आणि ३५ ए कलम हटवल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही.नरसिंह राव यांचे उदाहरण दिले होते. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी पार्लमेंटचे संयुक्त अधिवेशन घेत त्यांनी कायदा पारित करुन घेतला. ज्यामध्ये असे नमूद केले होते की काश्मीर ही देशाची फार मोठी समस्या आहे. पाकव्याप्त काश्मीर त्यांच्या ताब्यात असून हा भाग भारताने घेतल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असे तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी म्हटले होते. त्याचा दाखला देत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना उत्तर दिले की हे तुमचेच काम आहे, तुमच्याकडून झाले नाही म्हणून आम्ही करतोय. तर आता आपण वाट बघूया कदाचित २०२४ पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करायला काहीही हरकत नाही. या सगळ्या गोष्टी केवळ मोदी करु शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या