रंगभूमी दिना निमित्त रंंगकर्मींचा गौरव

रंगभूमी दिना निमित्त रंंगकर्मींचा गौरव

नाशिक | प्रतीनिधी Nashik

स्वताःल 'ए' ग्रेड म्हणवुन घेणाऱे कलावंत फक्त स्वताःचा स्वार्थ साधणारे असुन त्यांच्या पासून दुर राहुन सर्वच कलवंंतांना सन्मानाने जगता यावे. यासाठी सर्वानी एकत्र येऊन अन्याया विरुध्द लढावे.आंंदोलना शिवाय काहीही पदरी पडणार नाही.असे परखड प्रतिपादन अभीनेत्री सविता मालपेकर ( Actress Savita Malpekar )यांनी आज येथे केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे ( Akhil Bhartiya Marathi Natya Parishad, Nashik ) आज रंगभूमी दिना निमीत्त विविध रंंगकर्मींना श्रीमती मालपेकर यांच्या हस्ते गैारवीण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालीकेचे उपायुक्त मनोजकुमार घोडेपाटील प्रमुख अतीथी होते.

श्रीमती मालपेकर यांनी आज मुंबईच्या नाट्य परिषदेवर झोपेचे सोंग घेतल्याचा आरोप करुन त्यांना जागे करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांंनी निष्क्रीय अध्यक्षांवरही कडाडून टीका केली. तसेच तळागाळातील कालवंतांच्या प्रश्नावर ब्र शब्दाही न काढणार्‍या स्वताःला मोठे म्हणवुुन घेणार्‍या कलावतांवर चांगलेच तोंडसुख घेतले. सर्वच कलावतंवारील अन्याय दुर करण्यासाठी आंंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे त्ंयांनी स्पष्ट केले. मेकअप रुममध्ये ज्या पध्दतीनेे टीका करता तीच टीका उघडपणे तोंडाावर करण्यास का घाबरता? असा सवाल त्यांंनी रंगकर्मींना केला.

घोडे पाटील यांंनी नाशिकच्या फाळके स्मारकात हैद्राबाद, मुंबईच्या फिल्मसीटीच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्धार महापालिकेने केला असल्याचे जाहीर केले. तसेचे नाशिकच्या रंगकर्मींना सर्व सुवीधा देण्यासाठी महापालिका प्रशासन सदैव कटीबध्द् असल्याचे स्पष्ट केले. सुनील ढगे यांनी प्रास्तावीक केले. यावेळी अध्यक्ष रविंंद्र कदम, डॉ..अनिरुध्द धर्मधीकारी, शाहु खैरे, गणेश अवघडे व्यसपीठावर उपस्थीत होते. राजेश भुसारे,यांनी सुंत्रसंचालन केले. चारुदत्त दीक्षीत व सहकार्‍यांनी नांदी सादर केली.

यांना पुरस्काराचे वितरण

दत्ता भट स्मृती पुरस्कार ( प्रशांत दामले पुरस्कृत)अभिनय पुरुषांंसाठी - ज्येष्ठ रंगकर्मी अनिरुध्द देशपांडे

शांंता जोग स्मृती पुरस्कार अभिनय स्त्रियांसाठी- ज्येष्ठ रंगकर्मी अनुराधा राजाध्यक्ष,

प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार दिग्दर्शनासाठी - सतीश काठेेकर,

नेताजी दादा स्मृती पुरस्कार लेखनासाठी - श्रीपांद देशपांडे यांना ,

जयंंत वैशंपायन स्मृती पुरस्कार सांस्कृतिक पत्रकारितेसाठी - शरद खैरनार,

रामदास बरकले स्मृती पुरस्कार लोककलेसाठी - प्रकाश साळवे

श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार बालरंग भूमीसाठी -ज्येष्ठ रंंगकर्मी विद्याधर निरंंतर

गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार ( लोकशाहीरी) नंदा पुणेकर

विजय तिडके स्मृती रंगकर्मी पुरस्कार अरुण गिते यांना

सुमन माटे स्मृती पुरस्कार पार्श्व संगीतासाठी किरण नाईक

विशेष योगदाना बद्दल शरद पुराणीक व अशोक पिंगळे यांना पुरस्कार प्रदान करण्यातआला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी इश्वर जगताप, विक्रम गायकवाड, विजय शिंंगणे, राजेश जाधव, श्रीकांतं बेणी उपस्थीत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com