ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनाचा मार्ग मोकळा

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | शुभम धांडे Nashik

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून Directorate of Cultural Affairs of the State Government ज्येष्ठ कलाकारांना मानधन honorarium for senior artists देण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती तयार केली जाते. या समितीच्या मान्यतेने कलाकारांना दरमहा मानधन दिले जाते. दरम्यान जिल्ह्यातील कलाकारांना मानधन मिळावे यासाठी मार्च महिन्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने एक समिती गठित करण्यात आली.

मात्र जिल्हा परिषदेची समितीच्या दिरंगाईमुळे मार्च महिन्यात समिती स्थापन होऊनही कलावंताना न्याय मिळत नव्हता. अखेर समिती व्दारे झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या वतीने 2019-20 व 2020-21 ची मानधनपात्र कलाकारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 2019-20 साठी 89 आणि 2020-21 साठी 45 अशा कलाकारांची निवड समिती मार्फत करण्यात आली आहे.

दरम्यान दोन वर्षांत मानधनासाठी एकूण 280 कलाकारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये 2019-20 साठी 188 आणि 2020-21 साठी 92 प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी 134 कलाकार मानधनासाठी पात्र ठरले आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने निवडण्यात आलेल्या कलाकारांची यादी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आली आहे.

कलावंत त्याच्या कलाकारीसाठी जितकें प्रामाणिकपणे काम करतो. त्यातुलनेत त्याला मानधन अनेकदा मिळत नाही.त्यात वयाने ज्येष्ठ असूनही अनेक कलाकार आजही काम करतात. विविध ठिकाणी जाऊन गोंधळ, जागरण, कीर्तनाचे कार्यक्रम करतात. करोनामुळे त्या कार्यक्रमांवरदेखील गदा आली होती. त्यामुळे काम मिळणे बंद झाले.

अशात कला हीच उपजीविकेचे साधन असलेल्या कलाकारांसाठी आयुष्याच्या उत्तरार्धात सरकारकडून योग्य ते मानधन मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने स्थापन केलेल्या समितीने मानधनासाठी प्रतीक्षेत असलेल्या कलाकारांनाची निवड करत राज्य सरकारकडून त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी यादी पुढे पाठवली आहे.यामुळे कलाकारांचा मानधन मिळण्याचा मार्ग काही अंशी मोकळा झाल्याने अनेक ज्येष्ठ कलाकारांच्या दिलासा मिळाला आहे.

समिती स्थापन करण्यात आल्या नंतर ही निवड करण्यास वेळ झाला. मात्र पूर्वी आलेले अर्ज पाहून त्यावरून अधिक तपास न करता निवड केली जायची. मात्र यावेळी समितीतील सदस्य हे सांस्कृतिक क्षेत्रातील असल्यामुळे त्यातील बारकावे लक्षात घेत शासनाच्या नियमानुसार आलेल्या अर्जांमधून खर्‍या कलाकारांवर अन्याय होऊ नये हीच भूमिका होती. त्यानुसार पात्र कलावंतांची निवडी करण्यात आली आहे. त्याची अंतिम यादी तयार केली असून, ती मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविली आहे.

– सुनील ढगे, उपाध्यक्ष, निवड समिती

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *