Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यामनपा आयुक्तांचा सन्मान

मनपा आयुक्तांचा सन्मान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे (Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray Maharashtra Samriddhi Highway) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमध्ये झाले.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे नाशिक मनपाचे आयुक्त तथा प्रशासक व एमएसआरडीसीचे तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार ( Dr. chandrakant Pulkundvar )यांना विशेष प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कामाची प्रशंसा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्टिफिकेट देण्यात आले.

- Advertisement -

डॉ. पुलकुंडवार 5 मे 2018 ते 22 जुलै 2022 या कार्यकाळात एमएसआरडीसीचे संचालक होते. त्यापूर्वी बुलढाणाचे जिल्हाधिकारी असताना डॉ. पुलकुंडवार यांनी समृद्धीसाठी 1 हजार हेक्टर जमिनीची खरेदी केली होती. त्या नंतर ते एमएसआरडीसीमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक पदावर रुजू झाले.

बांधकाम क्षेत्रासाठी हा पथदर्शी आणि प्रत्येकाने आवर्जून अभ्यास करावा असा प्रकल्प आहे.पंतप्रधानांनी हिंदुदृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या 520 किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा टप्पा नागपूर ते शिर्डीपर्यंत जाणारा आहे. पुढे तो मुंबईपर्यंत नेला जाणार आहे. या संपूर्ण महामार्गाची लांबी 720 किमी इतकी आहे. राज्यातील सुमारे 10 जिल्ह्यांना जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे. यासाठी 55,000 कोटी रुपये इतका खर्च आला आहे.

हा द्रुतगती मार्ग भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांच्या विकासात या महामार्गामुळे मदत होईल. समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मार्गावर 26 टोल नाके आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या