भोंग्यासंबंधीची सर्वपक्षीय बैठक संपली; काय झाला निर्णय ?

भोंग्यासंबंधीची सर्वपक्षीय बैठक संपली; काय झाला निर्णय ?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात भोंग्यावरून (Loudspeaker row) सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने (Maharashtra govt) सर्वपक्षीय बैठक (all-party meeting) बोलावली होती. या बैठकीवर भाजपने बहिष्कार घातला. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीसाठी आपल्या पक्षाचे प्रतिनिधी पाठवले.

या बैठकीत, 'सकाळी ६ ते रात्री १० भोंगे बंद करता येणार नाहीत,' असा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरीकासाठी कायदा समान असून सर्वांना एकच भूमिका घ्यावी लागणार असून कायदा भंग झाला तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तसेच, भोंग्यांबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला असल्याने तो संपूर्ण देशासाठी लागू आहे. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने काही नियम केले आणि ते सर्वच राज्यांसाठी लागू केले तर राज्या-राज्यांमध्ये वेगळी परिस्थिती निर्माण होणार नाही. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारशी चर्चा करावी, अशी आमची भूमिका आहे, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

पुढे गृहमंत्री म्हणाले की, मी यासंबधी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणार आहे. सध्या आहेत त्या गाईडसलाईन्स पुराशा आहेत की, नाही किंवा त्यात काही आवश्यकता आहे का? कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाला तर पोलिस कारवाई करेल. असं देखील ते म्हणाले.

Related Stories

No stories found.