Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याSSR : ना बिहारचा विजय असून ना महाराष्ट्राचा पराभव

SSR : ना बिहारचा विजय असून ना महाराष्ट्राचा पराभव

मुंबई

सुशांत सिंह (SSR) मृत्यू प्रकरणात आता महाराष्ट्र सरकारची प्रतिक्रिया आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना ना बिहारचा विजय असून ना महाराष्ट्राचा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. सीबीआयला राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

SSR : पार्थ पवार बोलले, ‘ सत्यमेव जयते ’

सुशांत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल करण्याबाबत गृहमंत्र्यांनी होकार दिला नाही. तर सहपोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यासंदर्भात कायदेतज्ज्ञांच्या टीमशी बोलणे सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे अद्यापही ठाकरे सरकारने याबाबत निर्णय घेतला नसल्याचे दिसून येत आहे.

SSR : गुजरातचा हा अधिकारी सीबीआय टीमचा प्रमुख

अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंबंधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, तपासात मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी केली असून सर्वोच्च न्यायालयानेही तपासात दोष आढळला नसल्याचे म्हटले आहे. यामुळे हा निर्णय म्हणजे ना बिहारचा विजय असून ना महाराष्ट्राचा पराभव आहे. मुंबई पोलिसांसाठी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पन्नी अभिमानाची बाब आहे. संघराज्याची संकल्पना, त्याबाबत घटनातज्ज्ञांनी मंथन करावे, विरोधकांचे बिहार निवडणुकीसाठी राजकारण चालले आहे, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या