Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशटॅटू गोंदवण पडलं महागात!

टॅटू गोंदवण पडलं महागात!

मुंबई | Mumbai

सध्या तरुणाईमध्ये टॅटूची क्रेझ मोठी आहे. टॅटू हा एक फॅशनचा भाग मानला जातो. त्यामुळे आपल्याकडे अनेकांना टॅटू गोंदवणे आवडू लागले आहे.

- Advertisement -

मात्र हाच टॅटूचा शौक काही तरूणांना महागात पडलाय. टॅटू काढल्यामुळे १४ जणांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याची घटना धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

उत्तर प्रदेशामध्ये १४ जाणांना टॅटू गोंदवल्यानंतर अचानक ताप आला. त्यानंतर त्यांची टायफॉइड आणि मलेरियाचीही तपासणी करण्यात आली. पण त्यामध्ये काही निष्पन्न झाले नाही. त्या १४ जणांचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे त्यांची एचआयव्हीची तपासणी करण्यात आली. या चाचणीमधून त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे निदान झाले.

तज्ज्ञांच्या मते, टॅटू काढताना हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, टॅटू आर्टिस्टला इन्फेक्शन होणार नाही याची कशी काळजी घेतोय. तसेच एकदा वापरलेली सुई पुन्हा वापरत नाही ना याकडेही लक्ष दिले पाहिजे.

अनेकदा टॅटू आर्टिस्ट सुयांच्या किंमतीमुळे एकाच सुईने एकापेक्षा जास्त व्यक्तींचे टॅटू बनवतात. ज्यामुळे संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्यापर्यंत सहज पसरतो. त्यामुळे टॅटू आर्टिस्ट वापरत असलेली सुई नवीन आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या