आजपासून सुप्रीम कोर्टातील सुनावणी लाईव्ह पाहता येणार, कुठे पाहणार?

आजपासून सुप्रीम कोर्टातील सुनावणी लाईव्ह पाहता येणार, कुठे पाहणार?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खरी शिवसेना कुणाची ही अस्तित्त्वाची लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी कायदेशीर लढाई मागील काही महिनांपासून सुरू आहे.

आता घटनापीठासमोर या दोन्ही गटाचे दावे- प्रतिवादे ऐकल्यानंतर प्रकरण महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहचले आहे. आता कुणाच्या बाजूने या प्रकरणाचा निकाल लागणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. यामध्येच आता आजपासून घटनापीठाच्या केसेसचं लाईव्ह प्रक्षेपण यू ट्यूबवर होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सत्तांतराचे प्रकरण हेच लाईव्ह प्रक्षेपण होणारे पहिले प्रकरण आहे.

या लिंकवर पाहू शकता लाईव्ह – webcast.gov.in/scindia/

विशेष म्हणजे एकदा लाइव्ह सुनावणी झाल्यानंतर या खटल्यांचं पुनर्प्रक्षेपण होणार नाही. कारण सध्या ही व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com