Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याऐतिहासिक अशोकस्तंभ चौकाचे रुप पालटणार

ऐतिहासिक अशोकस्तंभ चौकाचे रुप पालटणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या ( NMC ) पुढाकाराने तसेच सीएसआर फंडातून ( CSR Funds) शहरातील ऐतिहासिक असलेल्या अशोक स्तंभ चौकाचे सुशोभिकरण (Beautification of Ashokastambh Chowk) होणार आहे. त्या दृष्टीने काम देखील सुरू झाले आहे. सुमारे पंधरा लाख रुपये यासाठी खर्च अपेक्षित आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत त्याचे काम पूर्ण होणार आहे.

- Advertisement -

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक महापालिकेकडून शहरातील अशोक स्तंभ आणि भोवतालच्या जागेचे सुशोभिकरण कामाला सुरूवात करण्यात आली आहे. सीएसआर फंडातून काम होत आहे. सुमारे 15 लाख रुपये खर्च करुन सुशोभिकरण केले जात आहे.15 ऑगस्टपूर्वी संपूर्ण काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे अशोक स्तंभ चौकाचे रुपडं पालटणार आहे. या ऐतिहासिक चौकाचे सुशोभीकरण झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

नाशिकमधील दीपक बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे (Deepak Chande, Director of Deepak Builders and Developers)यांनी सामाजिक बांधिलकीतून या कामासाठी मदत केली आहे. पुढील 10 वर्षांसाठी त्यांनी अशोक स्तंभाच्या देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी स्विकारली आहे. या कामाचे डिझाईन आर्किटेक्ट विशाल घोटेकर यांनी केले आहे. स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव या कल्पनेवर सुशोभिकरण करण्यात येत आहे.

शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्णत्वास येत आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महापालिकेकडून शहरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या