हिसार-कोईम्बतूर एसी एक्सप्रेसला आग

हिसार-कोईम्बतूर एसी एक्सप्रेसला आग

नवी दिल्ली | New Delhi

भारतीय रेल्वेची हिसार (Hisar) कोईम्बतूर (Coimbatore) एसी एक्सप्रेसला (Express) आग लागल्याच्या दुर्घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली...

याबाबत अधिक माहिती अशी की, निळजे - तळोजा रेल्वे स्टेशनवरून (Nilje - Taloja Railway Station) ही एक्सप्रेस रेल्वेगाडी हिसार येथून कोईम्बतूरच्या दिशेने धाव होती. त्यावेळी अचानक ही घटना घडली. त्यानंतर घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

दरम्यान, हिसार कोईम्बतूर एसी एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला ही आग (fire) लागल्याने परिसरात धुराचे मोठे लोट निघाले होते. तर वेळीच सतर्कता बाळगल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com