Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानामांतराच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर मध्ये हिंदू संघटनांचा मोर्चा

नामांतराच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर मध्ये हिंदू संघटनांचा मोर्चा

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar

तत्कालीन औरंगादबाद (Aurangadbad) शहराचे छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्यापासून अनेक मतमतांतरे समोर येत आहेत.

- Advertisement -

काही संघटना या नामांतराला विरोध दर्शवत आहेत तर, काही संघटना या नामांतराचे स्वागत करत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनेही होत आहेत.

लाचखोरीत नाशिक विभाग अव्वल

नामांतराची घोषणा झाली त्यावेळी सर्वप्रथम एमआयएमने याला विरोध करत आंदोलन केले. त्यानंतर काही मुस्लीम संघटनांनीही नामांतराला विरोध करत आंदोलन सुरु केले होते.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मोठा अपघात!

आज दि. १९ मार्च रोजी, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे सकल हिंदू एकत्रिकरण समितीने नामांतराच्या समर्थनार्थ मोर्चा काढला आहे. शहरातील क्रांती चौक ते औरंगपुरा या मार्गादरम्यान हा मोर्चा आयोजित करण्यात आला.

या मोर्चात छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ अनेक पक्षाच्या आणि संघटनांच्या नेत्यांनी सहभाग घेतला आहे. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी (Police permission) नाकारली आहे तरीही, हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.

Nashik : ‘त्या’ मारहाण प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

यापूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील परवानगी नसताना शहरात कँडल मार्च (Candle March) काढला होता आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय अशी भूमिका का ? असे म्हणत हा मोर्चा आयोजित करण्यात आला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

हा मोर्चा क्रांती चौकातून औरंगपुऱ्यात महात्मा फुले चौकापर्यंत जाणार आहे. याठिकाणी महात्त्मा फुलेंच्या पुतळ्यासमोर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा अनेक नेत्यांनी आपली भूमिका मांडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या