दुःखाचा डोंगर डोक्यावर घेऊन हिमांशूने केले नेव्ही मर्चंटमध्ये पदार्पण

अवघ्या सहा महिन्यातच केली आईच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती
दुःखाचा डोंगर डोक्यावर घेऊन हिमांशूने  केले नेव्ही मर्चंटमध्ये पदार्पण

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर (Through hard work) तालुक्यातील कुर्‍हे (पानाचे) येथील हिमांशू उत्तम काळे (Himanshu Uttam Kale) याने नेत्रदीपक कामगिरी करत मर्चंट नेव्हीमध्ये (Merchant Navy) प्रवेश मिळवला आहे. आईच्या निधनानंतर (death of the mother) अवघ्या सहा महिन्यातच त्याने परिक्षा (taking the exam) देऊन वर्षभरातच हे यश संपादन केले आहे. आईच्या निधनानंतर खचून न जाता हिमांशू यांने यश (Success acquisition)मिळविले आहे. त्याच्या सोबतच गावातील राम व लखन बारी (Ram and Lakhan Bari)या जुळ्या भावांनी (twin brothers) हे नेव्ही मर्चंटमध्ये (Merchant Navy) प्रवेश मिळवला आहे. या तीन युवकांच्या कामगिरीचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे.

दुःखाचा डोंगर डोक्यावर घेऊन हिमांशूने  केले नेव्ही मर्चंटमध्ये पदार्पण
अटल करंडक एकांकिका स्पर्धेत मूळजी जेठा महाविद्यालय विजयी

हिमांशू काळे हा पत्रकार उत्तम काळे यांचा मुलगा आहे. तर त्याच्यासोबतच नेव्ही मर्चंट मध्ये प्रवेश केलेले राम व लखन हे दोन्ही भाऊ गावातील कैलास बारी यांचे मुलं आहे. हिमांशू काळे यांचे लहानपगापासूनच आर्मीमध्ये जाण्याचे स्वप्न होते. 11 वी मध्ये असताना त्याने इंडियन नेव्हीसाठी दोन वेळेस परीक्षा दिल्या. मात्र या परीक्षांमध्ये तो दोन्ही वेळेस अपयशी ठरला होता. त्यानंतर त्याने एअर फोर्समध्येही दोन वेळेस परीक्षा दिल्या होत्या.

दुःखाचा डोंगर डोक्यावर घेऊन हिमांशूने  केले नेव्ही मर्चंटमध्ये पदार्पण
Photo # गाढेगाव येथील ओढयावर पक्षी निरीक्षण कार्यक्रमात ४५ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद

हिमांशूची आई आशा उत्तम काळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आईच्या निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसानंतरच त्याला पुन्हा एअर फोर्स या परीक्षेचा कॉल आला. आईचे दुःख मनात ठेवून तो त्या परीक्षेसाठी ही पुणे येथे गेला. या परीक्षेनंतर त्याची एअरफोर्ससाठी मेडिकल व फिजिकल चाचणी झाल्या. या परीक्षेचा निकालाची वाट पाहत असतानाच फेब्रुवारी 2022 मध्ये त्याला पुन्हा मर्चंट नेव्ही परीक्षेचा कॉल आला.

दुःखाचा डोंगर डोक्यावर घेऊन हिमांशूने  केले नेव्ही मर्चंटमध्ये पदार्पण
नाडगाव येथील १९ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या

परीक्षा पास झाल्यानंतर त्याची मार्च महिन्यात नवी मुंबई (बेलापूर) येथे मेडिकल झाली. तर सहा एप्रिल रोजी त्याची मर्चंट नेव्हीमध्ये निवड झाली असल्याचे पत्र त्याला प्राप्त झाले. 7 जुलै रोजी तो चेन्नई येथे मर्चंट नेव्हीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी रवाना झाला. 12 वी विज्ञान परीक्षेच्या निकालावरच त्याची निवड झाली.

दुःखाचा डोंगर डोक्यावर घेऊन हिमांशूने  केले नेव्ही मर्चंटमध्ये पदार्पण
फेकरी रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात

इंटरनेटलाच मानले गुरु !

जहाजावर त्याला ओ. एस. म्हणून काम करावे लागणार आहे. यासाठी चेन्नई येथे त्याला गेल्या पाच महिन्यापासून प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याच्या प्रशिक्षणाचा केवळ एकच महिना बाकी आहे. या निवडीसाठी त्याने आईचा आशीर्वाद व स्वप्नपूर्ती डोळ्या समोर ठेवून वडिल उत्तम काळे व मोठे वडील माजी उपसरपंच सुभाष काळे यांचे मार्गदर्शन व इंटरनेटचा सहारा घेतल्याचे सांगितले. शिक्षण ते मर्चंट नेव्ही हा प्रवास मोठ्या मेहनतीच्या जोरावर पार पाडत आहे. नेटच्या युगात हिमांशूची धडपड विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com