Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : जगातील सर्वात लांब बोगद्याचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

Video : जगातील सर्वात लांब बोगद्याचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

रोहतांग | वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि ३) ‘अटल टनेल’चे उद्घाटन हिमाचल प्रदेशातील रोहतांग येथे केले. (inauguration of atal tunnel) उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर उपस्थित होते.

- Advertisement -

या बोगद्यामुळे लेह ते मनाली अंतर जवळपास ४६ किमी ने कमी होणार आहे. लडाख परिसरात यामुळे बर्फाळ वातावरणात देखील रस्ता वाहतुकीसाठी खुला असेल.

अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात देशात एकूणच रस्ते आणि महामार्गबांधणीस सर्वोच्च प्राथमिकता देण्यात आली होती.

त्याचवेळी अशा प्रकारचा बोगदा असावा, अशी कल्पना मांडण्यात आली आणि त्याची आधारशीला २६ मे, २००२ साली रचण्यात आली होती असे सांगितले जाते.

मोदी सरकारने २४ डिसेंबर, २०१९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बोगद्याला ‘अटल टनेल’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला होता.

अटल टनेलची वैशिष्ट्ये

‘अटल टनेल’ हा जगातील एक मोठा बोगदा ठरेल

९.०२ किलोमीटरचा हा बोगदा आहे

हा बोगदा पिरपंजाल डोंगररांगेत समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट उंचीवर आहे

घोड्याच्या नालेच्या आकाराच्या या बोगद्याची दक्षिण बाजू मनालीपासून २५ किमी अंतरावर समुद्रसपाटीपासून तीन हजार ६० मीटर उंचीवर आहे

तर उत्तर बाजू लाहोल घाटामध्ये तेलिंग आणि सिस्सू गावाजवळ समुद्रसपाटीपासून तीन हजार ७१ मीटर उंचीवर आहे.

या बोगद्यातून दररोज तीन हजार मोटारगाड्या आणि १५०० मालवाहू ट्रक ९० किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहतूक करू शकतील

बोगद्यात दर १५० मीटरच्या अंतरावर दूरध्वनीची सुविधा

दर ६० मीटर अंतरावर अग्निशमन यंत्र, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळेदेखील आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या