देशात आता ५ लाख रुग्ण बरे
मुख्य बातम्या

देशात आता ५ लाख रुग्ण बरे

२४ तासांत तब्बल २७ हजार कराेना रुग्ण

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली। New Delhi

कराेनासंदर्भात दाेन बातम्या आल्या आहेत. पहिली सुखद बातमी म्हणजे देशातील ५ लाख १६ हजारापेक्षा जास्त कराेना रुग्ण बरे झाले आहेत. तर दुसरी बातमी म्हणजे देशात आता दर तासांला एक हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण देशात आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

देशात गेल्या चार दिवसांत एक लाख नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ८ लाख २२ हजार ६०३ झाली आहे. देशात दोन लाख ८३ हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत पाच लाख १५ हजार ३८६ रुग्ण बरे झाले आहेत. मागील २४ तासांत ५१९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २२ हजार १४४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com