एसटी संपावर आज तोडगा निघणार, आता पुन्हा बैठक

एसटी संपावर आज तोडगा निघणार, आता पुन्हा बैठक
एसटी

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि एसटी महामंडळाचे (ST Workers Strike)प्रयत्न सुरू आहेत. आता शरद पवार (sharad pawar)यांनी या बैठकीत तोडगा सांगितला होता. त्यानंतर राज्य सरकार व महामंडळाचे कर्मचारी यांच्यात काल (ST Workers Strike)चर्चा झाली. अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव या चर्चेत होता. आता आज पुन्हा कर्मचारी व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात चर्चा होणार असून संप मिटण्याची शक्यता आहे.

एसटी
तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

समितीचा अहवाल येईपर्यंत आणि विलिनीकरणाचा निर्णय होईपर्यंत कर्मचा-यांपुढे अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला असल्याचं वृत्त आहे.

मुंबईच्या आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी 15 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. अशावेळी आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पडळकर आणि कर्मचारी यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं. त्यात तोडगा निघून संप मागे घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

एसटी
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

शरद पवारांच्या नेमक्या सूचना काय?

  • शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्या बैठकीत एसटी महामंडळाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पवारांनी काही सूचना केल्या.

  • एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ द्या

  • पगारवाढ देताना अगदी कनिष्ठ स्तरावरील कर्मचारी ते वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा

  • पगारवाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर जो आर्थिक ताण पडेल, त्यासाठी अर्थमंत्र्यांनी वर्षभराची तरतूद करावी

  • आर्थिक भार सोसावा लागेल तरी चालेल पण भरघोस पगारवाढ द्या

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com