Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; 'ती' याचिका न्यायालयाने फेटाळली

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई | Mumbai

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्ता (Unaccounted Assets) जमवल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात (High Court) दाखल जनहित याचिकेवर (Public Interest Litigation) सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिल्याने ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे…

- Advertisement -

न्यायमूर्ती दिपांकर दत्ता (Justice Dipankar Dutta) यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी आज पार पडली. उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचा आरोप करत गौरी भिडे (Gauri Bhide) यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी एवढी मालमत्ता कशी जमवली आहे, त्यांच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय आहे याची चौकशी व्हावी. त्यांच्याकडे असलेली संपत्ती कुठून आली याची माहिती सर्वांना मिळायला हवी, असा आरोप भिडे यांनी केला होता.

दरम्यान, प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडच्या सामना वृत्तपत्राचा (Samana Newspaper) करोना काळातील टर्नओव्हर ४२ कोटी रुपये होता. या काळात सर्व वृत्तपत्र तोट्यात असताना सामना नफ्यामध्ये होता. या सर्वांची चौकशी व्हावी अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात केली होती.

ठाकरे कुटुंबियांची संपत्ती किती?

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार उद्धव ठाकरेंची एकूण संपत्ती जवळपास १२५ कोटींची आहे. यामध्ये २२ कोटींची शेअर्समधील गुंतवणूक आहे. १ कोटी ६१ लाखांची एफडी, मातोश्री आणि मातोश्रीसमोरील दोन घरे यांची किंमत ५२ कोटी आहे. तसेच कर्जतमध्ये एक फार्म हाऊस आहे.

तर रश्मी ठाकरे यांची ३५ लाखांची एफडी असून शेअर्स आणि बॉण्डमध्ये ३४ कोटींची गुंतवणूक आहे. याशिवाय ६ कोटी किमतीची जमीन त्यांच्या नावे आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीत एफडीमध्ये १० कोटींची गुंतवणूक आहे. शेअर्स आणि बॉण्डमध्ये २० लाखांची गुंतवणूक आहे. गाळे, जमीन अशी जवळपास ५ कोटींची संपत्ती त्यांच्या नावे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या