Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याहायकोर्टाकडून अनिल देशमुखांना ईडी कोठडी

हायकोर्टाकडून अनिल देशमुखांना ईडी कोठडी

मुंबई | mumbai

काल मुंबई नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या ईडी कोठडीची मागणी फेटाळली असून त्यांना मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली होती.

- Advertisement -

परंतु न्यायालयीन कोठडीला ईडीने आव्हान दिल्याने आता अनिल देशमुख यांना हायकोर्टाकडून १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी (ED custody) सुनावण्यात आली आहे…

100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी सुरु आहे. देशमुख यांनी गृहमंत्री असताना १०० कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता.

या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबर पर्यंत इडीची कोठडी सुनावली होती. अनिल देशमुख यांना काल न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र न्यायालयीन कोठडीला ईडीने आव्हान दिले. आज हायकोर्टाने अनिल देशमुख यांना १२ नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या