हिरो सायकलचा चीनला दणका ; 900 कोटींचा करार केला रद्द

चीनसोबतचा सर्व प्रकारचा व्यापार बंद
हिरो सायकलचा चीनला दणका ; 900 कोटींचा करार केला रद्द

नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोर्‍यात झालेल्या हिसंक चकमकीनंतर सरकारसह सर्वच भारतीयांनी चीनची आर्थिक नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. भारतातील प्रसिद्ध अशा हिरो सायकल कंपनीने चीनवर बहिष्कार टाकत भविष्यातील 900 कोटींचा करार रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

सध्या करोनाच्या संकटकाळात अनेक कंपन्या आर्थिक डबघाईला आल्या आहेत. पण हिरो सायकल अशा बिकट परिस्थितीतही सुसाट धावत आहे. अलिकडेच हिरो सायकल कंपनीने करोना विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारला 100 कोटी रुपयांची मदत दिली होती. त्यानंतर आताचीनवर बहिष्कार टाकत हिरो सायकल कंपनीने एका चिनी कंपनीशी केलेला तब्बल 900 कोटी रुपयांचा व्यवहार करार रद्द केला आहे. हा व्यवहार पुढील तीन महिन्यात पूर्ण होणार होता.

हिरो सायकलने चीनसोबतचा आपला सर्व प्रकारचा व्यापार बंद केला असून कंपनीने जर्मनीत नवीन प्लांट सुरू करण्याची तयारी केल्याची बोलले जात आहे. लॉकडाऊनमध्येही हिरो सायकलच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यानुसार कंपनीने उत्पादनात वाढ केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com