Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याहाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये हेरिटेज वॉक

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये हेरिटेज वॉक

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉकप्रमाणेच (High Court Heritage Walk) वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट (Hafkin Institute) येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे. या उपक्रमाची काल, रविवारपासून सुरुवात झाली. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार आणि रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त एक तासाचा असेल.

- Advertisement -

जागतिक पर्यटन दिनानिमित्त ( World Tourism Day)हेरिटेज वॉक सुरू करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. हेरिटेज चाहत्यांसाठी पहिली हेरिटेज टूर आज (दि.27)पासून सुरु करण्यात आली. या टूरची तिकिटे बुकमायशो डॉट कॉमवर बुक करता येतील. जास्तीत जास्त अभ्यासक आणि पर्यटन प्रेमी या उपक्रमाचा लाभ घेतील, असा विश्वास पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा( Tourism Minister Mangalprabhat Lodha) यांनी यांनी व्यक्त केला.

प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणीसाठी हाफकिन संस्था ही भारतातील सर्वात जुन्या बायोमेडिकल संशोधन संस्थांपैकी एक आहे आणि त्याची स्थापना 1899 मध्ये झाली. प्लेगच्या लसीचा शोध लावणार्‍या डॉ. वाल्डेमार माईकाय हाफकिनच्या नावावरून या संस्थेला ‘हाफकिन इन्स्टिटयूट’ असे नाव देण्यात आले.

सांसर्गिक रोगांच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी यात अग्रेसर असलेली एक बहुविद्याशाखीय संस्था म्हणून ही संस्था विकसित झाली आहे. ही संस्था राज्य आणि केंद्रीय सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणांसोबत काम करते. या संस्थेला जागतिक आरोग्य संघटनेने प्लेगसाठी संदर्भ प्रयोगशाळा म्हणून काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या