Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशहिंमत बिस्वा होणार आसामचे नवे मुख्यमंत्री

हिंमत बिस्वा होणार आसामचे नवे मुख्यमंत्री

गुवाहाटी:

भाजपला एकमेव राज्यात यश मिळालेल्या आसाममधील पेच अखेरी आठवड्याभरानंतर संपुष्टात आला आहे. विधिमंडळाच्या नेत्यापदाची निवड करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून बैठक सुरु होती. या बैठकीत आसामच्या मुख्यमंत्रीपदासाठी हिंमत बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामुळे सर्वानंद सोनोवाल यांचे नाव मागे पडले.

- Advertisement -

महत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी

आज झालेल्या भाजप विधीमंडळ गटनेत्यांच्या बैठकीत हिंमत बिस्वा सरमा यांची विधीमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आली. सरमा हे आज दुपारी ४च्या सुमारास राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करतील, असे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या