Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामित्राला प्रेयसीच्या भेटीसाठी केली मदत; चोर समजून ग्रामस्थांंनी दिला चोप

मित्राला प्रेयसीच्या भेटीसाठी केली मदत; चोर समजून ग्रामस्थांंनी दिला चोप

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील नांदूरशिंगोटे (Nandurshingote) परिसरात गेल्या काही दिवसांपासून दरोडोखोर (robber), चोरट्यांचा (thief) उच्छाद बघायला मिळत असून पुन्हा रात्रीच्यावेळी ते आठ जणांनी एका बंगल्याला लक्ष केले. मात्र, ग्रामस्थांनी केलेल्या कल्लोळानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला.

- Advertisement -

चोर आल्याच्या धावपळीत मित्राला (friend) प्रेयसीच्या भेटीसाठी सोडवून नांदूरशिंगोटे (Nandoorshingote) गावाकडे परतणार्‍या एकाला चोर असल्याच्या संशयावरून स्थानिकांनी पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. मित्राचे बिंग फुटू नये म्हणून या बिचार्‍याला पोलिसांचा (police) पाहुणचार सहन करावा लागला.

दोन दिवसांपूर्वी नांदूरशिंगोटे असणार्‍या शिवाजी आव्हाड यांच्या बंगल्यावर रात्री एकला दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी पुन्हा या भागात राहत असलेल्या शेळके यांच्या बंगल्याला रात्री नऊला चोरट्यांनी लक्ष बनवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, वेळ जास्त झालेली नसल्यामुळे व आधीपासून सावध असलेल्या नागरिकांनी धावाधाव केल्यामुळे चोरटे डोंगराच्या दिशेला पसार होण्यात यशस्वी झाले. धावपळीत सिन्नर (sinnar) एका गावातील तरुणाला मात्र, पोलिसांच्या चौकशीच्या ससेमिर्‍यात अडकावे लागले. स्थानिक तरुणांच्या धावपळीत हा अनोळखी तरुण संशयित म्हणून पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आला.

पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात आली. मात्र, त्याचे या भागात येण्याचे प्रयोजन वेगळेच असल्याने व ते कारणही मित्राच्या सुरक्षेसाठी सांगणे अशक्य असल्याने नाइलाजाने गुन्हा अंगावर घेण्याची वेळ या आली. रात्री आपल्या एका मित्रासमवेत हा तरुण नांदूर शिंगोटे परिसरातील एका गावात आला होता. तिथे पाहुण्यांकडे आलेल्या प्रेयसीची तिचा प्रियकर असलेल्या आपल्या मित्राची भेट घालून देण्याचा त्याचा उद्देश होता. मित्राला इच्छित स्थळी सोडल्यानंतर तो त्यांची भेट होईपर्यंत थांबायचे कुठे म्हणून नांदूर शिंगोटेपर्यंत आला.

याच दरम्यान चोर असल्याच्या संशयावरुन स्थानिकांना पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्यावर तो त्यांना खरे कारण सांगू शकत होता. मात्र, मित्राची सुरक्षा व भीतीपोटी त्याने ते सांगणे टाळले. त्याअगोदर तरुणास पोलिसांचा प्रसाद सहन करावा लागला. दुसर्‍या दिवशी या प्रकाराबद्दल समजल्यावर नांदूरशिंगोटे परिसरात हा विनोदाचा विषय ठरला.

सात जणांची डोंगराकडे धाव

सदरचा प्रकार गावात सुरुन असतानाच नाशिक-नगर हद्दीवर खंडोबा मंदिराजवळ संगमनेर येथील एका मजुराला रात्री सात जण डोंगराकडे पळून जाताना दिसले. सदरचा मजूर शेतामध्ये ठेवलेल्या सोयाबीनचे राखण करण्यासाठी थांबलेला होता. त्याने हा प्रकार मालकाला संगमनेर येथे कळविला. त्यानंतर संगमनेर येथून त्यांचे काही लोक आल्यानंतरही चोरटे डोंगराच्या दिशेने पळून गेले असल्याचे मजुराने सांगितले.

शेतकर्‍यांमध्ये दहशत

दररोजच्या चोरीच्या प्रकारामुळे वाड्या-वस्त्यांवर राहणार्‍या शेतकरीवर्गामध्ये दहशत पसरली आहे. कुठलाही शेतकरी रात्री बाहेर निघण्यास तयार नाही. त्यामुळे शेतीला पाणी देणे बंद झाले आहे. पोलिस प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करुन चोट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या