पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयात मदत कक्ष

पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयात मदत कक्ष

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे(Guardian Minister Dada Bhuse ) यांच्या संपर्क कार्यालयात वैद्यकीय मदत कक्ष ( Help Desk)कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री यांच्या संपर्क कार्यालयामार्फत देण्यात आली.

नागरिकांना आरोग्यविषयक समस्या, महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व इतर वैद्यकीय सुविधांबाबत आवश्यक शासकीय मदत या कक्षाद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी वैद्यकीय मदत कक्षाचे प्रभारी पंकज सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधावा. नागरिकांच्या मदतीसाठी हा कक्ष सदैव कार्यरत राहणार आहे.

जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या वैद्यकीय कक्षाची मदत सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या हेतूने पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून तो उभारण्यात आला आहे. या ठिकाणी आरोग्याबाबत असलेल्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com