उद्यापासून नाशकात पुन्हा हेल्मेट सक्ती

उद्यापासून नाशकात पुन्हा हेल्मेट सक्ती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात आता पुन्हा एकदा हेल्मेट ( Helmet ) सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या पासून (दि. 1 डिसेंबर) हेल्मेट सक्ती केली जाईल. सर्व नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा. हेल्मेट न वापरल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Nashik Police Commissioner Jayant Naiknaware) यांनी दिला आहे.नाशकात पोलीस आयुक्तपदी जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती झाल्यानंतर शहरातील हेल्मेटसक्ती बंद करण्यात आली होती. तुरळक ठिकाणी हेल्मेट तपासणी करण्यात येत होती.

तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकी चालकांना तब्बल दोन तासांचे समुपदेशन, नो हेल्मेट नो एन्ट्री आणि नंतर नो हेल्मेट नो पेट्रोल असे विविध उपक्रम राबवत नाशकात हेल्मेटसक्ती केली होती. त्यांच्या बदलीनंतर हेल्मेट सक्तीची कारवाई थंडावली.आता पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे.

हेल्मेटचा वापर न केल्यामुळे 83 चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले, यामुळे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. वाहन चालकामध्ये हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान आज पासून हेल्मेट न घातल्यास ५०० रुपयांच्या दंडात्मक कारवाईला दुचाकी चालकांना सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान उद्या स्वामी नारायण चौक , संतोष टी पा‍ॅ‍ॅईट,अशोकस्तंभ, एबीबी सर्कल ,पाथर्डी फाटा, बिटको पा‍ॅ‍ॅईट, येथे सकाळी १० ते १२ व संध्याकाळी ५ ते ७ वाजे दरम्यान चेकिंग होणार असल्याचे समजते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com