photo हेल्मेट सक्तीची कारवाई दणक्यात : इतक्या जणांची समुपदेशन केंद्रात रवानगी

photo हेल्मेट सक्तीची कारवाई दणक्यात : इतक्या जणांची समुपदेशन केंद्रात रवानगी
Published on
2 min read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात दुचाकीस्वरांना हेल्मेट (Helmet) सक्ती करण्यासाठी ठिकठिकाणी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याद्वारे हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांना दोन तासांचे समुपदेशन (Counseling) करण्याचा उपक्रम आजपासून सुरु झाला.

या प्रकारास काही हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांनी विरोध केला. आम्ही आमच्या गाडीने येतो, असे सांगत कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वाहनधारकावर दंडात्माक कारवाई न करता त्यांची रवानगी समुपदेशन केंद्राकडे केली.

photo हेल्मेट सक्तीची कारवाई दणक्यात : इतक्या जणांची समुपदेशन केंद्रात रवानगी
आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

सकाळच्या सत्रात ४० आणि दुपारच्या सत्रात ४० असे एकूण ८० जणांचे समुपदेशन केले.

photo हेल्मेट सक्तीची कारवाई दणक्यात : इतक्या जणांची समुपदेशन केंद्रात रवानगी
हेल्मेट सक्तीची कारवाई सुरु; समुपदेशनासाठी लागल्या रांगा

विनाहेल्मेट नागरिकांची दुचाकी ताब्यात घेऊन त्यांना पोलीस वाहनातून नाशिक फर्स्ट या मुंबई नाक्यावरील पोलीस समुपदेशन केंद्रांमध्ये दोन तासाचे समुपदेशन करण्यात येत आहे.

समुपदेशन पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यांची सुटका करण्यात येणार आहे. तरीदेखील हेल्मेट विना ती व्यक्ती दुचाकीवर पुन्हा आढळल्यास संबंधित व्यक्तीकडून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सह आयुक्त सिताराम गायकवाड (Sitaram Gaikwad) यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com