Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागुढीपाडव्यापासून नाशकात हेल्मेट सक्ती; दुचाकीवर दोघांना हेल्मेट अनिवार्य

गुढीपाडव्यापासून नाशकात हेल्मेट सक्ती; दुचाकीवर दोघांना हेल्मेट अनिवार्य

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील वाढत्या अपघाताच्या घटना लक्षात घेता पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती केली आहे. येत्या दोन एप्रिलपासून नाशकात दुचाकीवरील चालकासह मागे बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यात हेल्मेट अनिवार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. (Helmet Compulsory in Nashik city again)

- Advertisement -

त्यामुळे पुन्हा एकदा हेल्मेट परिधान करणे आवश्यक होणार असून ही मोहीम अधिक तीव्र स्वरुपात राबविली जाणार आहे.

विशेष म्हणजे, विनाहेल्मेट धारकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंप चालकांवर (Petrol Pump owner) आता आत्महत्येस प्रवृत्त (Suicide) केल्याचा गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे ही मोहीम अधिक तीव्र होणार असून नाशिककर या मोहिमेला कसा प्रतिसाद देतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विनाहेल्मेट दुचाकीस्वार आढळून आल्यास पाचशे ते हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे आजच हेल्मेट खरेदी करून घ्यावे असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या