श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

तमिळनाडू | Tamil Nadu

अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar News) यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे तमिळनाडूतील (Tamil Nadu News) इरोड येथे एमरजन्सी लँडिंग करण्यात आलं.

श्री श्री रवीशंकर सुरक्षित असून त्यांना कोणताही धोका नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, खराब वातावरणामुळे विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. रविशंकर यांच्याशिवाय त्यांचे दोन सहाय्यक आणि पायलट हेलिकॉप्टरमध्ये होते.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री श्री तामिळनाडूला काही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. पण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे लँडिंग सुरक्षित मानले जात होते. त्यामुळे हे लँडिंग करण्यात आले.

हेलिकॉप्टरचे लँडिंगची वेळ सकाळी १०.३० ते ११ च्या सुमारास सांगण्यात आली होती. मात्र, लँडिंगच्या ५० मिनिटांनंतर हवामान स्वच्छ झाल्यावर हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com