नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई

काही काळ विश्रांती घेतल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या 24 तासांत नाशिक (Nashik), जळगाव (jalgaonP, धुळे(dhule), नंदुरबार (nandubar) जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (heavy rain)ईशारा हवामान विभागाने (imd)दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असून अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

छत्तीसगड वर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम महाराष्ट्रासह राज्यावर दिसून येत आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. नद्यांना पूर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमध्ये घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यानं महामार्गावरील वाहतूक पूर्ण बंद झाली आहे.अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी जवळपास 12 तासापासून पाऊस सुरू आहे. नाशिकमध्ये उद्यासाठी (1 सप्टेंबर) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com