मेहरुण तलाव ओव्हरफ्लोच्या मार्गावर
मेहरुण तलाव ओव्हरफ्लोच्या मार्गावर

Breaking #जळगाव जिल्ह्यातील सात मंडलांमध्ये अतिवृष्टी

पारोळा, पाचोरा, भडगाव तालुक्याला पावसाने झोडपले; आत्तापर्यंत 103 टक्के पाऊस

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पितृपक्षातही (patriarchy) यंदा वरूणराजा (Varuna Raja) जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) दमदार बरसत (Raining heavily) आहे. गत आठवडाभरापासून जिल्हाभरात मुसळधार पावसामुळे (heavy rain) नद्या, नाले वाहू (Rivers and streams will flow) लागले आहेत. दरम्यान दि. 18 रोजी जिल्ह्यातील सात मंडलांमध्ये (seven mandalas) अतिवृष्टी (Heavy rain) झाल्याची नोंद (note) जिल्हा प्रशासनातर्फे (District Administration) करण्यात आली आहे.

यंदा जळगाव जिल्ह्यावर वरूणराजाची मोठी कृपादृष्टी राहिली आहे. साधारणत: पितृपक्षात उन्हाचे चटके जाणवतात. यंदा मात्र पितृपक्षातच जिल्हाभरात मुसळधार पाऊस होत असल्याने नद्या आणि नाल्यांना पूर आल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्वत्र पावसाने अक्षरश: दाणादाण उडाली असून शेतांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे कापूस, मका हि पिके धोक्यात आली आहे. तर सर्वसामान्य जनजीवनही या धुवाधार पावसाने विस्कळीत झाले आहे.

सात मंडलांमध्ये कोसळधार

जळगाव जिल्ह्यातील पारोळा, पाचोरा आणि भडगाव तालुक्यात काल दि. 18 रोजी जोरदार पाऊस झाला. यात तीनही तालुक्यातील सात मंडलांमध्ये 65 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. पारोळा तालुक्यातील शिरसगाव येथे 74.5 मिमी, मेहूणबारे 67.0, खडकी 65, तळेगाव 71.0, भडगाव 65.8 मिमी, कजगाव 67.8, कोळगाव 94.3 मिमी अशी अतिवृष्टी झाली आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत 103 टक्के पाऊस

जळगाव जिल्ह्यात जून ते दि. 18 सप्टेंबर या कालावधीत पावसाने शंभरी पार केली असून तब्बल 103.4 टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यात जळगाव तालुक्यात 103.4 टक्के, भुसावळ 91.6, यावल 111.6, रावेर 109.3, मुक्ताईनगर 111.3, अमळनेर 105.4, चोपडा 105.1, एरंडोल 100.4, पारोळा 89.8, चाळीसगाव 119.0, जामनेर 95.4, पाचोरा 94.7, भडगाव 114.7, धरणगाव 90.2 आणि बोदवड 85.5 टक्के असा पाऊस झाला आहे.

गिरणासह आठ धरणे शंभरी पार

जिल्ह्यातील धरणक्षेत्रातही मोठा पाऊस होत असल्याने गिरणासह आठ धरणांमधील पाणी साठ्याने शंभरी पार केली आहे. यात हतनूर धरणात 69.96 टक्के पाणीसाठा असून आठ दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले आहे. गिरणा धरणात 100 टक्के पाणीसाठा असून 6 दरवाजे 0.90 मीटरने उघडण्यात आले आहे. तर अभोरा, मंगरूळ, सुकी, तोंडापूर, अंजनी, बोरी आणि मन्याड धरणातही 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच वाघुर धरणात 85.63, मोर 94.69, बहुळा 79.90, अग्नावती 72.13, हिवरा 40.56, गुळ 80.05, भोकरबारी 35.26 टक्के असा पाणीसाठा आहे.

मेहरुण तलाव ओव्हरफ्लोच्या मार्गावर...

जळगाव शहरातही गेल्या चार दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. शहरातील नागरिकांचे मुख्य आकर्षण असलेला मेहरुण तलावातदेखील मोठा पाणीसाठा झाला असून, तो ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. मेहरुण तलाव भरल्याने या ठिकाणी शहरातील पर्यटकांचीही गर्दी होवू लागली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com