राज्यात मुसळधार, नाशिकमध्ये प्रतिक्षा

राज्यात मुसळधार, नाशिकमध्ये प्रतिक्षा

मुंबई :

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोरदार पावसाला (heavy rain) सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत पाऊस सुरु असला तरी नाशिकमध्ये (nashik)पावसाचे वातावरण तयार झाले असले तरी पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागांत 2 ते 3 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने (imd)दिला आहे.

राज्यात मुसळधार, नाशिकमध्ये प्रतिक्षा
आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

कोकणात मुसळधार

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुन्हा पाणी भरण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दापोलीत (Ratnagiri Rain) रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून शहरातील विविध ठिकाणी आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं आहे. दापोलीतीलकेळकर नाका, शिवाजीनगर, भारत नगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी या परिसरात सुमारे पाच फुटाने पावसाचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये हे पाणी शिरलेले आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि चिपळूण परिसरात एनडीआरएफचे २५ जवान आणि ४ बोटीसह पथक दाखल झालेले आहे.

मराठवाड्यातही जोरदार

मराठवाड्यातही ( Marathwada) पावसाचा (Rain) धुमाकूळ दिसून येत आहे. नदी, नाल्यांना पूर, धरणे भरली आहेत. अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, बीडमध्ये पूरस्थिती आहे. नांदेड जिल्ह्यात सोमवार सायंकाळ पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर पाऊसाने ऊसंत न घेता नांदेड जिल्ह्यास झोडपून काढले. मागील 24 तासात जिल्ह्यातील 80 महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहिती नुसार जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता दाट आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com