अतिपावसाचा कांदा रोपवाटिकेला फटका

उत्पादक आर्थिक संकटात
अतिपावसाचा कांदा रोपवाटिकेला फटका

नाशिक । विजय गिते Nashik

जिल्ह्यात ( Nashik District ) शुक्रवारपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची ( Heavy Rain Fall )दमदार हजेरी सुरू आहे.काही भागात तर अतिवृष्टी या प्रकारात हा पाऊस झालेला आहे. या पावसाचा खरीप हंगामाला ( Kharif Season ) फायदा होणार असला तरी येणार्‍या कांदा पिकाला ( Onion )मात्र, हा पाऊस नुकसानकारक ठरत आहे.कसमादेचां परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी टाकलेले कांद्याचे ऊळयाला (बियाने) मात्र,मोठा फटका बसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत

जिल्ह्यातील काही भागात अति पावसाने शेतात पाणी साचण्या बरोबरच ओढ्या नाल्यांना व नद्यांना पूर आल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. हा पाऊस मका, सोयाबीन, बाजरी व कडधान्य या पिकांना लाभदायक ठरत आहे. मात्र, चांदवड, देवळा, कळवण, बागलाण, मालेगाव या तालुक्यांमधील कमी

पाऊस पडतो अशा भागातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी लाल कांद्याचे बियाणे पंधरा दिवसांपूर्वी टाकलेले आहे. हे बियाणे काही भागात उतरले होते तर काही ठिकाणी मोड आलेले होते. अशा रोपांना मात्र अति पावसाचा फटका बसला आहे.

कांदा बियाण्याची किंमत ही एका पायलीसाठी सहा ते आठ हजार रुपये (प्रति किलो आठशे ते एक हजार) इतका दर सुरू आहे.चाडवड,देवळा,मालेगाव तालुक्यातील काही भागामध्ये लाल कांद्याचे उत्पादन अगोदर घेतले जाते.त्यासाठी शेतकर्‍यांनी बियाणे टाकले होते. मात्र,त्यालाही अति पावसाचा फटका बसल्याने या भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.रोपवाटिका खराब झाल्यामुळे पुन्हा नव्याने कांदा बियाणे घेऊन शेतकर्‍यांना रोपवाटिका तयार करावी लागणार आहे.मात्र,यास महिनाभराचा अवधी पुध्ये लोटला जाणार असल्यामुळे शेतकर्‍यांना त्याचाही दुहेरी फटका बसणार आहे.

खरीप हंगामातील शेतपिकांचा विमा काढण्याची मुदत ही 31 जुलै 2022 पर्यंत आहे. मात्र, ही मुदत वाढवून देणे गरजेचे आहे. कारण कांदा या पिकाचा विमा काढायचा म्हटल्यास अद्याप कांद्याची लागवड झालेली नाही आणि ती 31 जुलैपर्यंत होणार देखील नाही. आता शेतामध्ये कांदा लावलेलाच नाही तर नोंद करायची कुठून? कारण विमा काढायचा म्हटल्यास कांद्याचे पीक हे पीक पेर्‍यावर येणे आवश्यक आहे. त्यामुळे पीक विमा काढण्यासाठी मुदत वाढ मिळाणे आवश्यक आहे. कांदा रोप तयार करणार्‍या शेतकर्‍यांच्या व्यथा सरकारपर्यंत लोकप्रतिनिधीकडून पोहोचने गरजेचे आहे.

जयदीप भदाणे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com