मोचा चक्रीवादळाचे सावट; राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

भारताच्या पूर्व किनारपट्टीला मोचा चक्रीवादळाचा (Mocha Cyclone) धोका असून या आठवड्यात पश्चिम बंगाल आणि ओडिशात हे वादळ धडकेल असा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविला आहे…

बंगालच्या खाडीत चक्रवाताची स्थिती तयार होत असल्याने ८ मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदमान, निकोबार, केरळ, तामिळनाडू या भागात १२ मे पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात देखील पुढील आठवडाभर विजांच्या कडकडाटासह पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे.

World Laughter Day : आज ‘जागतिक हास्य दिन’… जाणून घ्या, का साजरा केला जातो? काय आहे इतिहास?

याबाबत हवामान विभागाने माहिती देताना म्हटले आहे की, ७ मे पासून आग्नेय बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेटांवर आणि अंदमान समुद्राच्या लगतच्या भागात ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. या वाऱ्याचा वेग ६० किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच मोचा चक्रीवादळामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या हवामानात देखील बदल होईल असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

तर पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत गारपीट होण्याची शक्यता असून केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ८ मे पर्यंत दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्याने ९ मे च्या सुमारास ते आग्नेय बंगालच्या उपसागरात उच्च दाबात रुपांतर होईल. त्यानंतर चक्रीवादळात आणखी तीव्र होऊन मध्य बंगालच्या उपसागराच्या दिशेनकडून उत्तरेकडे सरकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *