Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रआयुक्त म्हणतात, यामुळे मुंबई तुंबणारच

आयुक्त म्हणतात, यामुळे मुंबई तुंबणारच

मुंबई

मुंबई (Mumbai Rain) ला बुधवारी पावसाने चांगलंच झोडपून काढले. पहिल्या पावसातच मुंबईची ‘तुंबई’ झालेली पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. यामुळे विरोधकांनी टीका सुरु केली आहे. मुंबईत पाणी भरणारच नाही, असा दावा कोणीच केलेला नाही आणि आम्ही असा करणार सुद्धा नाही, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. दरम्यान मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उत्तर दिले आहे.

- Advertisement -

Photo पहिल्याच पावसात मुंबई तुंबली

काय म्हणाले आयुक्त

पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. मुंबई का तुंबली? यावर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आतापर्यंत १४० ते १६० मिमी पाऊस झाला आहे. तसेच अवघ्या तासाभरात ६० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई तुंबली. आपल्याकडे ड्रेनेजची कॅरिंग कॅपॅसिटी कमी असल्याने काही तासांसाठी मुंबईत पाणी तुंबणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाल्या महापौर

विरोधकांची होणारी टीका आणि पालिका प्रशासनाची तयारी याच मुद्द्यांवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, ‘सकाळी हायटाईडमुळे आणि पावसाच्या जोरामुळे शहरात काही तासांसाठी पाणी थांबले होते. पण, आता मात्र शहरात पावसाचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. आपण गेल्या वर्षापासून हेच सांगत आहोत की पाणी भरणार नाही असा दावा आम्ही केला नाही.’

जबाबदार कोण? भाजपचा सवाल

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, गेल्यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मुंबईत भरणाऱ्या पाण्याला मुख्यमंत्री जबाबदार राहतील, असे सांगितले होते. मग आता त्यांनी सांगावे मुंबईमध्ये साचलेल्या पाण्याला जबाबदार कोण ? मुख्यमंत्री की मुंबई महापालिका?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या