Maharashtra Rain Update : राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत मुसळधार पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Rain Update : राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत मुसळधार पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई | Mumbai

मागील तीन दिवसांपासून देशासह राज्यात गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा केला जात आहे. त्यामुळे गणपती उत्सवादरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत दडी मारून बसलेला पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला होता. यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचे आगमन झाले असून येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे....

Maharashtra Rain Update : राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत मुसळधार पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Nashik Bribe News : चार हजारांची लाच घेतांना महिला अधिकाऱ्यास अटक

याबाबत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई, कोकण, ठाण्यासह नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तसेच रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, जालना, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता पुढील चार ते पाच दिवसात राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update : राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत मुसळधार पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Sukha Duneke : कॅनडामध्ये पंजाबी गँगस्टर सुखदूल सिंग सुक्खाची हत्या

तर हवामान तज्ज्ञ के.एस होसळीकर यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये २१ सप्टेंबरपासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात अंतर्गत जिल्ह्यांमध्ये येत्या चार ते पाच दिवसांत पिवळ्या इशाऱ्याने दर्शविल्या गेलेल्या तुरळक ठिकाणी, गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण आणि गोव्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

आजपासून पुढील चार ते पाच दिवस मुंबई, कोकण, पुणे, ठाणे, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे तसेच मराठवाड्यात मुसळधार पाऊस होईल. विदर्भ-बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Maharashtra Rain Update : राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत मुसळधार पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांना अलर्ट
मोठी बातमी! आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष धाडणार शिंदे, ठाकरेंना नोटीस
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com