Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाउस

ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाउस

नाशिक । प्रतिनिधी

संध्याकाळी विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.

- Advertisement -

रात्री उशीरापर्यंत शहर व उपनगरीय परिसरात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. पुढिल दोन चार दिवस पावसाची हजेरी कायम राहील असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

नवरात्राच्या दुसर्‍या माळेपासून वरुणराजा रोज शहर व जिल्ह्यात हजेरी लावत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा अगोदरच हवामान खात्याने दिला होता. तो खरा ठरवत जोरदार पाउस बरसत आहे.

मागील आठवड्यात कोकणासह मराठवाडा व विदर्भात पावसाने कहर केला. पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. शेतातील उभी पिके आडवी झाली. अोला दुष्काळ सारखी परिस्थिती उदभवली आहे. त्या तुलनेत उत्तर महाराष्ट्र व विशेषत: नाशिकमध्ये पावसाचा जोर कमी होता म्हणून फारसे नूकसान झाले नाही.

मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर जिल्ह्यात वाढला आहे. गुरुवारी दुपारनंतर अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशीरापर्यंत शहर व उपनगरिय परिसरात पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी सुरु होती. मधूनमधून विश्रांती घेत पाऊस पडत होता. पावसामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची फजिति उडाली.

तर रस्त्यावरील दुकानदार व विक्रेत्यांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पाण्याचे पाट वाहत होते. अनेक ठिकाणी पाणि साचले होते. हवामान खात्याने पुढील दोन तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. ते बघता शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. जोरात पाऊस आलातर हाता तोंडाशी आलेले पिक वाया जाण्याची भिती त्यांना सतावत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या