file photo
file photo

Maharashtra Rain Update: राज्यात पुढील चार तासांत 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळणार; नाशिक, नगरचं काय?

मुंबई | Mumbai

कालपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे नद्या, नाले, डोंगरदऱ्या पुन्हा एकदा दुथडी भरून वाहताना दिसत आहे. तर काही ठिकाणी अति पावसामुळे जनजीवन विस्कळीत (Life Disrupted) झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यांत पुढील ३ ते ४ तासांत जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे....

file photo
Nagpur Rain Update : नागपूरमध्ये पावसाचा हाहाकार; घरांत शिरले पाणी, वाहनांचे मोठे नुकसान

याबाबत पुणे वेधशाळेने (Pune Observatory) दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ ते ४ तासांत मुंबई, रायगड, जालना, संभाजीनगर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, ठाणे या जिल्ह्यांत मुसळधार पावसाच्या (Heavy Rain) सरी बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

file photo
Nashik Onion News : चौथ्या दिवशीही जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद; कोट्यवधींची उलाढाल ठप्प, कांदा व्यापारी भूमिकेवर ठाम

तर दुसरीकडे काल रात्रीपासून पावसाने नागपुरला (Nagpur) झोडपून काढले असून या जिल्ह्यातील शाळांना मुसळधार पावसामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाने (Rain) रौद्ररुप धारण केल्याने संपूर्ण नागपूर शहर पाण्याखाली गेले असून पावसाच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना (Citizens) एनडीआरफचे पथक (NDRF Team) रेस्क्यू करत आहे. तसेच पुण्यात (Pune) देखील आज सकाळपासून पावसाची संतधार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

file photo
Nashik Dindori News : करंजवण धरण १०० टक्के भरले; धरणातून 'इतक्या' क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु, पाहा Video

त्याबरोबरच उद्यापासून पुढील चार ते पाच दिवस विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच राज्यात मान्सून अतिसक्रिय असल्यामुळे अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता (Possibility) आहे. तर २४ ते २९ सप्टेंबरपर्यंत कोकण आणि गोव्यात (Konkan and Goa) बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी राहील, अशी माहिती देखील पुणे वेधशाळेच्या हवामानतज्ज्ञांनी दिली आहे. याशिवाय २५ सप्टेंबरपासून मान्सूनचा भारतातून परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

file photo
उल्हासनगर हादरले! सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट; चार ते पाच जण दगावल्याची भीती

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com