Wednesday, April 24, 2024
HomeनंदुरबारVideo उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस शहाद्यात

Video उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस शहाद्यात

photo यंदाच्या वर्षातील सर्वात जोरदार पाऊस

शहादा

- Advertisement -

नंदुरबार (nandubar)जिल्ह्यातील शहाद्यात (shahada)प्रचंड पाऊस झाला. गेल्या २४ तासांत तब्बल १४६ मिमी पाऊस झाला. शहाद्यात ढगफुटी सद्दश्य पाऊस झाला. यामुळे अनेक घर व सरकारी कार्यालयात पाणी घुसले. या पावसामुळे वित्तहानी प्रचंड झाली.

गेल्या २४ तासांतील पाऊस

नंदुरबार-27

शहादा-146

अक्कलकुवा-77

नवापूर-21

धडगाव अक्रानी-102

तळोदा-66

शहादा तालुक्यासह शहरात मंगळवारी सायंकाळी पावसाची जोरदार अतिवृष्टी झाल्याने शहरातील विविध वस्त्या, रस्ते, शासकीय कार्यालये जलमय झाली.काही ठिकाणी वृक्षांची पडझड झाल्याने काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विज वितरण कंपनीचा कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले.

शहरासह तालुक्यात (ता.७) मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल दोन तास मुसळधार झाला. त्यात पाटाचे पाणी शहरात आल्याने डोंगरगाव रस्त्यावरील न्यायालयीन परिसर,प्रांत अधिकारी कार्यालय तसेच दोंडाईचा रस्त्यावरील शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्टेट बँक आवार सर्वत्र पाण्याखाली होते. दरम्यान २०१९ ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काही वकील बांधवांनी तात्काळ धाव घेत महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित स्थळी हलविले. दरम्यान ज्या कार्यालय परिसरात पाणी साचले आहे त्या साऱ्याच अधिकाऱ्यांना काही काळ कार्यालयात जाणे पाण्यामुळे जायबंदी झाले होते.प्रांताधिकारी कार्यालयात गुढघाभर पाणी साचल्याने तिथे बसणाऱ्या वेंडर बांधवांनी पाण्यामुळे कामकाज बंद केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. शहरालगत जाणाऱ्या भेंडवा नाल्याला यंदा प्रथमच पाणी आले. नाल्या लागतच शहराला पाणीपुरवठा करणारे पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र असल्याने जलशुद्धीकरण केंद्रात पाणी गेल्याने शहराचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला. कर्मचाऱ्यां मार्फत पालिकेने लागलीच साफसफाई सुरू केली आहे.

दरम्यान शहरातील वसाहतींमध्ये व मुख्य रस्त्यांवर पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असल्याने नागरिक त्याच्यातून मार्ग काढत होते.

तालुक्यात मंडळनिहाय पर्जन्य मिमी मध्ये–

शहादा : १४६,

कलसाडी:१२८

प्रकाशा: ८६

ब्राह्मणपुरी:९२

म्हसावद : ८२

मोहिदे त.श.: १०५

वडाळी: ४१

असलोद: ९०

मंदाणा: ८२

सारंगखेडा: ८६

तालुका एकुण:९३८ मिमी.

उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस शहाद्यात

आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

- Advertisment -

ताज्या बातम्या