सिन्नर तालुक्यात पावसाचा हाहाकार

सिन्नर तालुक्यात पावसाचा हाहाकार

नाशिक | Nashik

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने (Rain) जिल्ह्यासह ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावल्याने अनेक तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच काल रात्री सिन्नर तालुक्यात (Sinnar taluka) ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे...

काल रात्री झालेल्या मुसळधार पाऊसामुळे सिन्नर शहरातील भैरवनाथ मंदिरासमोरील (Bhairavanath Temple) सरस्वती नदीलगतच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील दापूर (Dapur) येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.

याशिवाय तालुक्यातील नांदूर शिंगोटे (Nandur Shingote) दोडी बुद्रुक (Dodi Budruk) दोडी खुर्द (Dodi Khurd) चापडगाव( Chapdgaon) सोनेवाडी (Sonewadi) माळवाडी, गोंदे, मानोरी, कणकोरी, मरळ, निराळे आधी भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने शेतीसह घरांचे नुकसान झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com