Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात जोर'धार'; गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी

नाशकात जोर’धार’; गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास पाऊस (Rain) शहरासह जिल्ह्यातील काही भागांत हजेरी लावत आहे. या पावसाने (Rain) नागरीकांची चांगलीच तारांबळ उडत आहे…

- Advertisement -

आज सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. साडेपाचच्या सुमारास नाशकात पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली.

सलग तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या या पावसामुळे गणेशोत्सवावर (Ganeshotsav) पाणी फेरले आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांसह गणेश भक्तांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

सचिन पिळगावकरांच्या लेकीचे बोल्ड फोटोशूट, चाहते घायाळ

दरम्यान, नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरु आहे.

संतापजनक! तीन हजारात मेंढपाळांना दिली मुलगी, चिमुरडीचा बेदम मारहाणीमुळे मृत्यू

त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्यात पुढील दोन दिवस जाणवण्याची शक्यता आहे. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीवर पावसाचे ढग राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या