Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये मुसळधार; रस्ते पाण्याखाली

नाशिकमध्ये मुसळधार; रस्ते पाण्याखाली

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुपारी नाशिकमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरीक हैराण झालेले असताना अचानक पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला.

- Advertisement -

नाशिक शहरातील सातपूर, शिवाजीनगर, श्रमिकनगर, नवीन नाशिक, पाथर्डी फाटा, मध्यनाशकासह सर्वदूर पावसाने मुसळधार हजेरी लावली. दीड वाजेपासून सुरु असलेल्या पावसाने नाशिकमधील सर्वच रस्ते जलमय झाले. या हंगामातील सर्वात जास्त पावसाने आज तारांबळ उडाली.

मेन रोड परिसरात बाजारपेठ पूर्ववत झाल्यामुळे अचानक आलेल्या पावसाने नाशिककरांची पुरती धांदल उडाली.

शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९६ टक्के भरले आहे. पावसाच्या विश्रातीनंतर धरणातून विसर्ग थांबविण्यात आला आहे. मात्र आज अचानक आलेल्या मुसळधार पावसाने धरणातील पाणीसाठा वाढल्यास गोदावरीत पुन्हा विसर्ग होण्याची शक्यता आहे.

पावसाच्या हजेरीनंतर शहरातील काही भागात बत्ती गुल झाली आहे. तर अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव बघायला मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या